हर्णै ः | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै ः
हर्णै ः

हर्णै ः

sakal_logo
By

rat5p45.jpg
L26910
हर्णै ः येथे पाजपंढरीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मच्छीच्या ट्रकला लारलेली आग.
...
बर्निंग ट्रकचा थरार,
ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी

हर्णैतील प्रकार; लाखोंची हानी, वणव्यामुळे आग लागल्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
हर्णै, ता. ५ ः येथे पाजपंढरीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मच्छी वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग कशी लागली, याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही." बर्निंग ट्रकचा थरार ३ तासपर्यंत सुरू होता. तो ४ वाजण्याच्या सुमारास संपला.
या मार्गावर गेले कित्येक दिवस श्रीवर्धन (रायगड) तालुक्यातील (एमएच-०६-बीजी-४२०३) या नंबरचा एक मासळी वाहतुकीचा ट्रक उभा होता. आज ता. ५ रोजी अचानक दुपारी दीडच्या सुमारास या ट्रकला आग लागली. ताबडतोब पोलिसांना खबर देण्यात आली. हर्णै दूरक्षेत्राचे बीट अंमलदार दिलीप गोरे, पोलिस सुशील मोहिते, दिलीप नवाले घटनास्थळी हजर झाले. हा ट्रक रस्त्याच्या एका बाजूलाच गेले काही महिने बंद अवस्थेत उभा केला होता. ज्या ठिकाणी उभा होता, त्या ठिकाणी मोकळं शेत असून, या शेतात असणाऱ्या सुक्या गवताला अगोदरच वणवा लागला होता. या वणव्यामुळेदेखील आग लागली असावी, असे प्रथमदर्शनी पोलिसांनी निष्कर्ष काढला आहे. घटनास्थळी ही आग विझवण्यासाठी नगरपंचायतीची अग्निशमन दलाची टीम, ग्रा. पं. सदस्य इस्माईल मेमन, राकेश तवसाळकर, अभिजित पतंगे, साईराज मोरे, अमोल चौलकर आदी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. उपसरपंच महेश पवार, सरपंच ऐश्वर्या धाडवे, सर्व सदस्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. घटनेचा अधिक तपास हर्णै पोलिस करत आहेत.
--------------------------------------------------------------
चौकट
बंब येण्यास उशिर..
आग लागताच एक बाजूला असणाऱ्या घरामधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी लगेच ओरड केली. ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती; परंतु आग आटोक्यात आणण्यासाठी काहीच प्रयत्न होत नव्हते. कारण, हर्णै गावामध्येच गेले दोन दिवस पाणी आले नसल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी उपल्ब्ध नव्हते. तातडीने दापोली नगरपंचयतीचा पाण्याचा बंब बोलावण्यात आला. बंब येण्यास उशीरच झाला होता. आल्यावर बंबाच्या साहाय्याने चालू असलेली पूर्ण आग विझवली. तोपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता. तसेच सुदैवाने या गाडीच्या डिझेल टँकमध्ये डिझेलच नव्हते. नाहीतर अग्नितांडव निर्माण झाले असते. दीडच्या सुमारास हा सुरू झालेला "ट्रकचा बर्निंग थरार" ४ वाजण्याच्या सुमारास संपला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65080 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top