
रत्नागिरी- प्लास्टिक मुक्त रत्नदुर्ग मोहिमेला प्रतिसाद
rat5p46.jpg
L26911
- रत्नागिरी : प्लास्टिकमुक्त रत्नदुर्ग मोहिमेत सहभागी सुभेदार मायनाक भंडारी स्मारक समिती, शिवप्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते.
.......
प्लास्टिकमुक्त रत्नदुर्ग मोहिमेला प्रतिसाद
रत्नागिरी, ता. ५ ः पर्यावरण दिन आणि उद्या (ता. ६) शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सुभेदार मायनाक भंडारी स्मारक समिती, शिवप्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकमुक्त रत्नदुर्ग मोहीम राबवण्यात आली.
किल्ल्याच्या परिसरात असणारा प्लास्टिक कचरा, बाटल्या एकत्रित करण्यात आल्या. याहीवेळी रत्नदुर्ग किल्ल्यावरील परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. आपल्या पराक्रमी पूर्वजांनी घाम गाळून वाढवलेले व रक्त सांडून टिकवलेले हे गडकिल्ले तळीरामांचा अड्डा बनत आहेत. मुख्य प्रवेशद्वार ते मिरकरवाडा माची भागात सर्रास दारूच्या पार्ट्या व घाणेरडे प्रकार घडतात. पोलिस व स्थानिक प्रशासनाने या संदर्भात कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. गडावर येणाऱ्या शिवप्रेमी व पर्यटकांनी या परिसरात कचरा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. नगर पालिकेमार्फत पर्यटक येणाऱ्या परिसरात कचराकुंडी ठेवली पाहिजे. जेणेकरून त्यात सर्व प्रकारचा कचरा गोळा करता येईल, असे या वेळी सहभागी संस्थांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
या मोहिमेत ॲड. अमित काटे, सौरभ सुर्वे, महेश कदम, तेजस देशमुख, अमित सूर्यवंशी, नंदकुमार साळवी, प्रसाद घोडगे, प्रसन्न यादव, जयदीप साळवी, अक्षत सावंत, अमृत औघडे, अमित नाईक, प्रथमेश तळगावकर, दिगंबर चव्हाण, सिद्धेश सावंतदेसाई, रोशन गावडे, अमृत पाटील, यश डोंगरे, आर्यन आग्रे, कार्तिक टापरे, केवलेश सप्रे, दीपक कोलापटे, वरद कोतवडेकर यांनी सहभाग घेतला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65085 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..