सत्यमामुनी स्वामींची पिंगुळी मठास भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्यमामुनी स्वामींची पिंगुळी मठास भेट
सत्यमामुनी स्वामींची पिंगुळी मठास भेट

सत्यमामुनी स्वामींची पिंगुळी मठास भेट

sakal_logo
By

सत्यमामुनी स्वामींची पिंगुळी मठास भेट
कुडाळ ः दक्षिण भारतातील आध्यात्मिक व मेडिटेशन गुरू श्री सत्यमामुनी स्वामीजी यांनी पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज व प. पू. अण्णा राऊळ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. श्री सत्यमामुनी स्वामीजी यांचे गोवानंतर सिंधुदुर्गात आगमन झाले आहे. संत राऊळ महाराज समाधीसमोर श्री सत्यमामुनी बराचवेळ ध्यानस्थ झाले होते. आजूबाजूच्या भक्तिमय वातावरणाने ते भारावून गेले. संत राऊळ महाराजांचे शिष्य प. पू. विनायक उर्फ अण्णा राऊळ महाराजांच्या समाधीस्थळाचेही त्यांनी दर्शन घेतले. प. पू. राऊळ महाराज मठाच्यावतीने स्वामींचा यथोचित सन्मान करण्यात आला. ‘एक्सेल ग्रुप ऑफ स्कूल’च्या संस्थापक एम. डी. ब्रिंदा श्रीकुमार, चेअरमन डॉ. श्रीकुमार, परफेक्ट अ‍ॅकॅडमीचे संस्थापक संचालक प्रा. राजाराम परब, बाळ कालेकर, मठाचे ट्रस्टी दशरथ राऊळ, पुरोहित विनायक प्रभू आदी होते.
-----------
धाकोरकरांचा आरवलीत सत्कार
वेंगुर्ले ः आरवली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विनय धाकोरकर यांची बदली झाल्याने ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांतर्फे आरवली गावातील चांगल्या सेवेबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गावचे सरपंच तातोबा कुडव व आरवली ग्रामस्थांतर्फे आरवली तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मयूर आरोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आरवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच रिमा मेस्त्री, सदस्य किरण पालयेकर, समीर कांबळी, वैशाली रेडकर, जाधव, प्रवीण मेस्त्री, माजी सरपंच विलास चिपकर उपस्थित होते.
-----
वेंगुर्लेत ‘बौद्धाचार्य’ची सांगता
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई अंतर्गत (कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग व गोवा विभाग) आयोजित दोन दिवसीय बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर आनंदवाडी, वेंगुर्ले येथे ज्येष्ठ बौद्धाचार्य नारायण आरोंदेकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात १० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. यात ३ महिला भगिनींचाही समावेश होता.
---
काळसेत गतिरोधकाची मागणी
चौके ः मालवण-नेरूरपार-कुडाळ या मार्गावर धामापूर ते नेरुरपार दरम्यानच्या रस्त्यावर भरधाव वाहनांच्या अपघातांची संख्या वाढल्यामुळे काळसे-धामापूरमधील ग्रामस्थांनी वाहनांच्या जीवघेण्या वेगाला आवर घालण्याची मागणी केली होती. याबाबत काळसे गावात शिवाजी विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गतिरोधक करण्यासाठी बांधकाम उपविभाग, मालवणचे कनिष्ठ अभियंता नितीन दाणे यांना निवेदन दिले.
------------
भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार
वेंगुर्ले ः गोवा राज्याच्या निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या सहभागाबाबत प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे तसेच गोवा राज्याचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी त्यांचे कौतुक करून सन्मान केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे सरचिटणीस प्रसन्ना देसाई, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बाळू प्रभू तसेच तुळसचे माजी सरपंच विजय रेडकर यांचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65109 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top