
पावस-पावस गटात सेनेची ताकद वाढली
शिवसेना चिन्ह वापरा
...........
सेनेची ताकद पावस गटात वाढली
जिल्हा परिषद गटाची अदलाबदल; गणेशगुळेचा नव्याने समावेश
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ६ ः आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटांची निश्चिती केली असून, पावस जिल्हा परिषद गटातील मागील निवडणुकीत दुसऱ्या गटात गेलेले गणेशगुळे गाव अखेर पुन्हा पावस गटामध्ये समाविष्ट केल्याने समाधान व्यक्त होत आहे. १५ वर्षे गणेशगुळे ग्रामपंचायतीवर सेनेचे वर्चस्व आहे. हे गाव पावस गटात आल्याने सेनेची ताकद वाढली आहे.
यापूर्वी गणेशगुळे, निरूळ, चांदोर ही गावे पावस जिल्हा परिषद गटामध्ये समाविष्ट होती; परंतु गोळप जिल्हा परिषद गट निर्माण झाल्याने ही तीन गावे या गटामध्ये गेली होती. त्यामुळे पावस गटासाठी असलेला संपर्क कमी झाला होता. गोळप जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून या तीन गावांची नव्याने बांधणी करण्यास सुरवात झाली होती. असे असताना यातील गणेशगुळे गाव पुन्हा पावस जिल्हा परिषद गटामध्ये समाविष्ट केले.
पावस जिल्हा परिषद गटांमध्ये पारंपरिक शिवसेना व भाजप युती अभेद्य होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आपले बस्तान बसवण्यास वेळ मिळत नव्हता. शिवसेनेने या गटामध्ये आपले वर्चस्व निर्माण व्हावे, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसशी संगत करण्यास सुरवात केली. त्याला कालांतराने यश आले. कोणत्याही परिस्थितीत भविष्यात या गटावर व तालुक्यावर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी राष्ट्रवादीला मदत करून त्यांचा आमदार निवडून आणला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेच्या पारंपरिक मतांबरोबर राष्ट्रवादीचा मतदारही सेनेशी जोडला गेल्याने सेनेची ताकद वाढली. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत सेना-भाजप स्वबळावर लढले. सेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक गट सामील झाल्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले. त्यामध्ये एक जिल्हा परिषद व एक पंचायत समिती शिवसेनेला. त्यात एक मूळ शिवसैनिक व दुसरा आमदार गटाचा उमेदवार असे निवडून आले. एका पंचायत समिती गणामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला.
-------
चौकट
जिल्हा परिषद निवडणुकीत रंगत
सध्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पावस, नाखरे, गावडेआंबेरे, गावखडी, मेर्वी या ग्रामपंचायती शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या आहेत, तर गणेशगुळे, मावळंगे, पूर्णगड भाजप पुरस्कृत पॅनेलच्या ताब्यात आहेत. शिवारआंबेरे, डोर्ले या ग्रामपंचायती गावपॅनेलच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत रंगतदार सामना होणार आहे. या दोन पक्षांबरोबर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून तिरंगी लढतीची अपेक्षा आहे.
---------
चौकट
१५ वर्षे सेनेचेच वर्चस्व
गणेशगुळे गावची पंचवार्षिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. सध्या सात जागांपैकी पाच जागा भाजपकडे आहेत, तर दोन जागा शिवसेनेकडे आहेत. ही ग्रामपंचायत गेली १५ वर्ष शिवसेनेकडे आहे.
-------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65195 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..