शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये साहिश तळणकरला रौप्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये साहिश तळणकरला रौप्य
शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये साहिश तळणकरला रौप्य

शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये साहिश तळणकरला रौप्य

sakal_logo
By

swt६१.jpg
२६९९८
सावंतवाडीः रौप्य पदकासह साहिश तळणकर

शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये
साहिश तळणकरला रौप्य
सावंतवाडीः हुबळी ओपन शूटिंग चॅम्पियनशिप कर्नाटक २०२२ या स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टल प्रकारात मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावच्या साहिश दिगंबर तळणकर याने १७ वर्षाखालील गटात ६०० पैकी ५५७ गुण मिळवत रौप्य पदक पटकावले. यापूर्वी देखील साहिशने डेरवण, अहमदाबाद, दिल्ली, भोपाळ येथे झालेल्या विविध स्पर्धांत यश मिळविले आहे. तसेच भारतीय नेमबाजी संघ निवड चाचणीतही त्याची निवड झाली आहे. त्याला प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर, आंतराष्ट्रीय प्रशिक्षक श्री. विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले. आईवडिलांचे नेहमीच सहकार्य असते. या यशाबद्दल संस्था सचिव आर. आर. राऊळ, अध्यक्ष शिवराम मळगावकर, खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा सावंत, पर्यवेक्षक श्री. फाले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समिती, पंचक्रोशीतील पालक, ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65196 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top