
चिपळूण-चिपळुणात वहाळ गटाह 2 गण वाढले
निवडणूक चिन्ह वापरा
..
चिपळुणात वहाळ गटासह दोन गण वाढले
बदलामुळे इच्छुकांचा हिरमोड; १० जिल्हा परिषद सदस्य निवडणार
चिपळूण, ता. ६ ः तालुक्यात यापूर्वी ९ जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समिती गण होते. नव्या पुनर्रचनेत जिल्हा परिषदेचा एक गट वाढला असून, पंचायत समितीचे दोन गट वाढले आहेत. जि. प. चे १० सदस्य तर पं. स. त २० सदस्य आता निवडून येणार आहेत. गट आणि गणांची नावे बदली असून खेर्डी, शिरगाव, शिरळ, वहाळ, निवळी, उमरोली ही नावे नवीन असून पेढे, अलोरे, सावर्डे, कोकरे ही गटाची जुनीच नावे आहेत. अनेक गावांची अदलाबदल झाल्याने भौगोलिकदृष्ट्या काही गावांची अडचण झाल्याने नाराजी पसरली आहे. तर गावे बदलल्याने अनेक इच्छुकांचा उमेदवारांचा हिरमोडदेखील झाला आहे.
नव्याने जाहीर झालेल्या शिरळ गटात शिरळ व भोम गण, पेढे गटात पेढे व दळवटणे गण, अलोरे गटात अलोरे व पिंपळी खुर्द गण, शिरगाव गटात शिरगाव व पिंपळी बुद्रुक गण, सावर्डे गटात सावर्डे व चिंचघरी गण, खेर्डी गटात खेर्डी व कापसाळ गण, उमरोली गटात उमरोली व वाघिवरे गण, वहाळ गटात वहाळ व मूर्तवडे गण, निवळी गटात निवळी व दहिवली बुद्रुक गण, कोकरे गटात कोकरे व कुटरे गण अस्तित्वात आले आहेत. तर शिरळ गणात कोंढे, कालुस्ते, धामेली कोंड, कालुस्ते खुर्द, करंजीकर मोहल्ला, मजरेकाशी,खोपड, शिरळ, वैंजी, रेहेळ भागाडी, मालघर तर भोम गणात मालदोली, गांग्रई, दोणवली, बिवली, करंबवणे, केतकी, कापरे, पोसरे, भोम, भिले या गावांचा समावेश आहे.
पेढे गणात पेढे, परशुराम, वालोपे, कळंबस्ते तर दळवटणे गणात पाली, खांदाट, नवीन कोळकेवाडी, मोरवणे, मोरवणे बु., वालोटी, आकले, कादवड, तिवरे, रिक्टोली, तिवडी, दळवटणे, निरबाडे या गावांचा समावेश आहे. अलोरे गणात पेढांबे, कोळकेवाडी, नागावे, अलोरे तर पिंपळी खुर्द गणात ओवळी, कळकवणे, दादर, गाणे, खडपोली, पिंपळी खुर्द, नांदिवसे, राधानगर, गणेशपूर, स्वयंदेव ही गावे समाविष्ट आहेत. शिरगाव गणात कुंभार्ली, कोंडफणसवणे, पोफळी, आखुसखाँनगर, शिरगाव तर पिंपळी बुद्रुक गणात कान्हे, अडरे, मांडवखरी, वेहेळे, मुंढेतर्फे चिपळूण, अनारी, तळसर,पिंपळी बुद्रुक ही गावे येतात.
सावर्डे गणात सावर्डे, सावर्डे खुर्द, कासारवाडी, डेरवण, डेरवण खुर्द, कुडप तर चिंचघरी गणात कामथे, कामथे खुर्द, टेरव, टेरव बुद्रुक, वेतकोंड, चिंचघरी, कोंडमळा ही गावे आहेत. खेर्डी गणात खेर्डी या एकमेव गावाचा समावेश राहिला आहे. एक गाव आणि एक गण असलेला खेर्डी एकमेव पंचायत समिती गण राहिला आहे तर कापसाळ गणात कापसाळ, मिरजोळी, उक्ताड, धामणवणे, कळवंडे ही गावे येतात. उमरोली गणात रामपूर, तळेगाव, जोधगाव, उभळे, आगरवाडी, उमरोली, निर्व्हाळ, कात्रोळी, कुंभारवाडी, मनाळी, आंबेरे बुद्रुक, पाचाड, गुढे तर वाघिवरे गणात चिवेली, लोणारी बंदर, वाघिवरे, कौंढरताम्हाणे, बामणोली, बोरगाव, मार्गताम्हाणे, मार्गताम्हाणे खुर्द, कळमुंडी, गोंधळे, मजरे गोंधळे, हनुमान गाव ही गावे आहेत. वहाळ गणात वहाळ, आबिटगाव, तुरंबव, खांडोत्री, ढाकमोली, ढोक्रवली, ओमळी, पवारवाडी, ताम्हनमळा या गावांचा समावेश आहे तर मूर्तवडे गणात कळंबट, केरे, घवाळवाडी, गुळवणे, मूर्तवडे, वारेली, कातळवाडी, तोंडली, पिलवलीतर्फे सावर्डे, पिलवलीतर्फे वेळंब, वीर, वीर देवपाट ही गावे येतात.
निवळी गणात वडेरु, नायशी, निवळी, पालवण, मांडकी, मांडकी खुर्द, आगवे तर दहिवली बुद्रुक गणात दहिवली बुद्रुक, दहिवली खुर्द, खरवते, रावळगाव, देवखेरकी, नारदखेरकी, शिरवली, पाथर्डी, मिरवणे, डुगवे ही गावे आहेत. कोकरे गणात कोकरे,असुर्डे, आंबतखोल, हडकणी, खेरशेत, कुशिवडे तर कुटरे गणात कुटरे, नांदगाव खुर्द, नांदगाव, कोसबी, फुरुस, येगाव, तळवडे, पाते, मजरे गोवळ, दुर्गवाडी, दुर्गवाडी खुर्द, मंजुत्री, मुंढेतर्फे सावर्डे या गावांचा समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65210 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..