लाजा-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाजा-संक्षिप्त
लाजा-संक्षिप्त

लाजा-संक्षिप्त

sakal_logo
By

-ratchl61.jpg
26989
ः चिपळूण ः सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रास लॅपटॉप व प्रिंटर सुपूर्द करताना आमदार शेखर निकम व पदाधिकारी.
--------------
प्राथमिक आरोग्य केंद्रास लॅपटॉप व प्रिंटर
चिपळूण ः तालुक्यातील सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास लॅपटॉप, प्रिंटरच्या अभावामुळे कार्यालयीन कामकाजाच्या डाटा एन्ट्री, कोरोनासंबंधी आरटीपीसीआरची माहिती शासनाला देणे, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची ऑनलाइन माहिती शासन व जनतेला देण्यासंदर्भात अनेक अडचणी येत होत्या. या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने लॅपटॉप व प्रिटंर उपलब्ध करून देण्याची मागणी माजी सभापती पूजा निकम यांच्याकडे आरोग्य केंद्राने केली होती. त्याची दखल घेत आमदार शेखर निकम व पूजा निकम यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रास लॅपटॉप व प्रिंटर देण्यात आला. माजी सभापती निकम यांनी आपल्या पंचायत समिती गण विकास आराखडा (१५ वा वित्त आयोग) सन २०२०-२१ निधीतून लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून दिला. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय पाटील यांच्याकडे तो सुपूर्द केला.
-----------------
-rat6p6.jpg
L26988
ः लांजा ः कृत्रिम अवयव व साहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप कार्यक्रमात बोलताना आमदार राजन साळवी.
------------
गतिमंद आणि ज्येष्ठ नागरिकांच्या
समस्या सोडवणारः आमदार साळवी
लांजा ः केंद्र शासनाच्या वयोश्री योजनेंतर्गत आणि खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे लांजा तालुक्याला सुमारे सव्वा कोटी रुपयांचे साहित्य प्राप्त झाले आहे. गतिमंद आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार राजन साळवी यांनी दिली. केंद्र शासन नियुक्त भारतीय कृत्रिम अंग अवयव निर्माण निगम कानपूर आणि जिल्हा परिषद, लांजा पंचायत समितीतर्फे तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेंतर्गत कृत्रिम अवयव व साहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. लांजा शाळा क्र. ५ मध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जगदीश राजापकर, बाबू म्हाप आदी उपस्थित होते. आमदार साळवी यांनी मनोगत मांडले. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात सहा लाभार्थ्यांना व्हीलचेअर, कुबड्या व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65221 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top