चिपळूण ः चिपळूणमध्ये वृक्षरोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः चिपळूणमध्ये वृक्षरोपण
चिपळूण ः चिपळूणमध्ये वृक्षरोपण

चिपळूण ः चिपळूणमध्ये वृक्षरोपण

sakal_logo
By

-rat6p8.jpg
27010
ःचिपळूण ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शहरातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
------------------
चिपळुणातील वनक्षेत्रात वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त १०० रोपांची लागवड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिपळूण पालिका हद्दीमधील वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले. शहरात शंभर रोपे लावण्यात आली. या वेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, शहरातील शाळांधील विद्यार्थी व एनसीसीचे विद्यार्थी तसेच स्थानिक मंडळे व स्वयंसेवी संस्था व महिला बचतगट प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी पेठमाप येथील लहान मुलांनी पथनाट्य सादर करून प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम तसेच होणाऱ्या आजारांची माहिती दिली. कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन केले. प्लास्टिक बंदीबाबत शहरातून प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत पंचमहाभुते यांवर आधारित (पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायू) हे विविध उपक्रम पालिकेतर्फे साजरे करण्यात आले. या उपक्रमांतर्गत पालिकेने १४२४ झाडे लावून त्यांचे संवर्धन केले. यामध्ये विविध संस्था तसेच स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत २५० वृक्षांची लागवड केली तसेच निसर्गातील जैवविविधता अधिक टिकवून ठेण्यासाठी फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केली.
या ठिकाणी ३० हून अधिक जातींच्या फुलांची लागवड केली. तसेच वृक्ष लागवडीसाठी अशरफ मेमन यांच्याकडून २५ झाडे, प्रकाश काणे यांच्याकडून ८ झाडे, साहिल डेव्हलपर्स अब्दुल शेख यांच्याकडून १५ झाडे, सद्गुरु श्री विश्वनाथ रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर हरित विश्व उपक्रम यांच्याकडून १०० झाडे, हेल्प फाउंडेशन यांच्याकडून २०० झाडे, विश्वास खाडीलकर यांच्याकडून २५ झाडे, विवेकानंद रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्सिट्यूट लोटे जिवाजी बाबूराव राणे स्मृती प्रतिष्ठान यांच्याकडून २५ झाडे वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून देण्यात आली.
..
एक नजर...
पालिकेने झाडे लावून त्यांचे संवर्धन केलीः १४२४
विविध संस्था, स्वयंसेवी संस्थामार्फत वृक्ष लागवडः २५०
विविध जातींच्या फुलांची लागवडः ३० हून अधिक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65222 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top