तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे
तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे

तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे

sakal_logo
By

L27066
टीपः swt६२५.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - तळेरे ः पथनाट्य सादर करताना विद्यार्थी. (छायाचित्र ः एन. पावसकर)

तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे
डॉ. अभिजित कणसे : तळेरेत पर्यावरण दिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ६ ः तरुण पिढी वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेलेली आहे. भविष्य घडवायचे असेल, तर तरुणांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. असे आवाहन डॉ. अभिजित कणसे यांनी केले. तळेरे येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित प्रबोधनात्मक उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
तळेरे येथे डॉ. अनिल नेरूरकर पुरस्कृत तंबाखू प्रतिबंध अभियान, तळेरे तसेच श्रावणी कॉम्प्युटर तळेरे आणि मेधांश कॉम्प्युटर कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. या कार्यक्रमांचे उदघाटन डॉ. अभिजित कणसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
तंबाखू प्रतिबंध अभियान, तळेरेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही जागतिक तंबाखू विरोधी दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम या विषयावर पथनाट्य, फुगडी, प्रभात फेरी या माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात आली.
येथील बाजारपेठ तसेच बस स्थानकासमोर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून प्रबोधन केले. संपूर्ण बाजारपेठेत ढोलपथक, फुगडी आणि पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. अभियानच्या संचालिका सौ. श्रावणी मदभावे तसेच श्रावणी व मेधांश कॉम्प्युटरचे संचालक सतीश मदभावे यांचे सहकार्य लाभले. तरुणपिढी व्यसनाधीन होण्यापासून प्रवृत्त करणे तसेच तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत समाजामध्ये जाणीव निर्माण होण्यासाठी उपक्रम राबविल्याचे सौ. मदभावे यांनी सांगितले. या उपक्रमाला नीलेश तळेकर, मंगेश मुद्रस, तळेरेचे माजी सरपंच प्रवीण वरुणकर, विजय पेडणेकर, वक्ते-अभिनेते प्रमोद कोयंडे, ओरोस नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. अनिता मदभावे, कणकवली माजी उपसभापती प्रकाश पारकर, पत्रकार संजय खानविलकर, दत्तात्रय मारकड, प्रणाली मांजरेकर, राहुल धुमाळे तसेच श्रावणी व मेधांश कॉम्प्युटरचे विद्यार्थी उपस्थित होते.
............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65284 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top