पावस-गोळप गटातील फेरबदलाने समीकरणे बदलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-गोळप गटातील फेरबदलाने समीकरणे बदलणार
पावस-गोळप गटातील फेरबदलाने समीकरणे बदलणार

पावस-गोळप गटातील फेरबदलाने समीकरणे बदलणार

sakal_logo
By

निवडणूक चिन्ह वापरा
...
गोळप गटातील फेरबदलाने बदलणार समीकरणे

गणेशगुळे वगळले; फणसोपऐवजी भाट्ये गणात चार गावे
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ७ ः जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोळप जिल्हा परिषद गटामध्ये एक गाव कमी केले असून त्या गावाचा पूर्वगटात असलेल्या पावस जिल्हा परिषद गटामध्ये समाविष्ट केला. त्यामुळे संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या रणनीतीवर पाणी पडले आहे. येथील समीकरणे बदलल्याने नव्याने रणनीती तयार करावी लागणार आहे.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत गोळप जिल्हा परिषद गटामध्ये दोन पंचायत समिती गण निर्माण करण्यात आले होते. त्यामध्ये फणसोप पंचायत समिती गणामध्ये फणसोप तोणदे, कोळंबे, भाट्ये आदी गावांचा समावेश होता. तो या निवडणुकीमध्ये कायम ठेवण्यात आला, तर गोळप पंचायत समिती गणांमध्ये निरूळ, चांदोर, गणेशगुळे आदी गावांचा समावेश केला होता. त्यामुळे गोळप पंचायत समिती गणांमध्ये गोळपबरोबर या तीन गावांचा समावेश करून गण तयार करण्यात आला; परंतु या वेळी यातील गणेशगुळे गावाला गोळपमधून काढून पावस गटामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे गोळप पंचायत समिती गणामध्ये गोळपबरोबर निरूळ, चांदोर या तीन गावांचा पंचायत समिती गण जाणार आहे. फणसोपऐवजी भाट्ये पंचायत समिती गणांमध्ये कोळंबे, तोणदे, फणसोप आदी चार गावांचा समावेश राहणार आहे.
..
चौकट
सेना-भाजप स्वबळावर लढणार
गोळप जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यातील दोन सदस्य मूळ शिवसेना व एक सदस्य आमदार समर्थक आहे. त्याचबरोबर या गटातील ग्रामपंचायती सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. एक ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात नाही. त्यामुळे येणारी ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका सेना-भाजप स्वबळावर लढणार आहेत. गोळप गटातील निरूळ, चांदोर व तोणदे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यकाल सप्टेंबरमध्ये संपणार असल्याने यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागणार असल्याने निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65307 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top