
रत्नागिरी ः तालुक्यातील 11 ठिकाणी फेरफार अदालत
27152ः संग्रहीत
....
तालुक्यातील ११ ठिकाणी फेरफार अदालत
तहसीलदार जाधव; उद्या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी, ता. ६ ः महाराष्ट्र शासनाच्या ''महाराजस्व अभियान'' अंतर्गत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी तालुक्यातील मंडळस्तरावर नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ''फेरफार अदालत'' आयोजित करण्यात येते. यामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावर जे फेरफार विनातक्रारी आहेत आणि ज्या फेरफाराची नोटीस बजावणी होऊन १५ दिवस पूर्ण झाले आहेत, कोणतीही हरकत प्राप्त नाही, असे फेरफार या अदालतीमध्ये तयार करू दिले जातील. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार शशिकांत जाधव यांनी केले आहे.
फेरफार अदालत ८ जूनला रत्नागिरी, खेडशी, पाली, फणसोप, टेंब्ये, तरवळ, खालगांव, जयगड, मालगुंड, पावस, कोतवडे अशा ११ ठिकाणी फेरफार आयोजित केल्या आहेत. या वेळी विनातक्रारी व मुदत संपलेले फेरफार निर्णित केले जातील. तरी तलाठी, मंडळस्तरावर फेरफार प्रलंबित असणाऱ्या नागरिकांनी आपल्या मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क करून त्या दिवशी उपस्थित राहून आपला फेरफार तयार करून घ्यावा. या निर्णित फेरफाराचा तत्काळ सातबारा अमल केला जाणार आहे. नागरिकांना तत्काळ अद्ययावत सातबारासुद्धा याच ठिकाणी मिळू शकतो, असे तहसीलदार जाधव यांनी सांगितले.
...
चौकट
नायब तहसीलदारांनी उपस्थित रहावे
याबाबत काही अडचणी आल्यास त्याचे निवारण करण्यासाठी व फेरफार अदालत योग्यप्रकारे पार पाडली जात असल्याचे पर्यवेक्षण करण्यासाठी फेरफार अदालतीस सर्व नायब तहसीलदार यांना उपस्थित राहण्याबाबत तहसीलदार जाधव यांनी आदेश दिले आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले नायब तहसीलदार यांच्याकडे आपल्या फेरफारांबाबत काही तक्रारी असल्यास नागरिकांनी मांडाव्यात. जास्तीत जास्त नागरिकांनी ही फेरफार अदालतीस उपस्थित राहून प्रलंबित फेरफार निर्णित करून घ्यावेत, असे आवाहन तहसीलदार शशिकांत जाधव यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65308 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..