श्यामची आई चित्रपटात रत्नागिरीचा बालकलाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्यामची आई चित्रपटात रत्नागिरीचा बालकलाकार
श्यामची आई चित्रपटात रत्नागिरीचा बालकलाकार

श्यामची आई चित्रपटात रत्नागिरीचा बालकलाकार

sakal_logo
By

श्यामची आई चित्रपटात
रत्नागिरीचा बालकलाकार
सोहम आडिवरेकरची चमक ; राज्य नाट्य स्पर्धेतून सुरवात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक अभिनय क्षेत्रात सोहम आडिवरेकर हा तारा चमकू लागला आहे. गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम संजीवन गुरुकुल रत्नागिरी येथे सातवीत शिकणारा अकरा वर्षाचा बालकलाकार पुणे फिल्म कंपनीनिर्मित संजय डहाके दिग्दर्शित "श्यामची आई" दिवाळी २०२२ ला प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटात मुंबई-पुण्यातील मोठमोठ्या कलाकारांसोबत चमकणार आहे. लहानपणीचा श्यामचा भाऊ दिवाकर याची भूमिका सोहमने उत्कृष्ट अभिनयाने साकारली आहे.
सध्या या चित्रपटाचे रत्नागिरी आणि पुण्यातील चित्रीकरण पूर्ण झाले आहे. वडील नाट्यप्रेमी आणि अनेक नाटकात उत्कृष्ट अभिनय सादर करणारे कलाकार असल्याने आपल्या वडिलांकडून सोहमच्या अंगी ही कला उतरल्याने सोहमला वडिल प्रथम गुरुस्थानी आहेत. तसेच आपल्या संपूर्ण आडिवरेकर कुटुंबातील सर्वांच्या प्रोत्साहनामुळे, आशीर्वादामुळे आपण अभिनय क्षेत्रात पुढे जाण्याचा अधिक प्रयत्न तो करत आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या सतराव्या महाराष्ट्र राज्यनाट्य स्पर्धेत "प्रश्न" या एकांकितेत गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले. ग. दि. माडगूळकर यांच्या जीवनावर आधारित प्रकाश पारखी (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या "नाच रे मोरा" या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेऊन आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. शालेय स्तरावरील कार्यक्रमात वक्तृत्व व नाट्यछटा अभिनय स्पर्धेत सलग चार वर्षे विविध पारितोषिके सोहमने मिळवली आहेत. शालेय कार्यक्रमात अनेकवेळा उत्तम सूत्रसंचालन केले आहे. मुळगाव राजापूर तालुक्यातील आडिवरे श्री महाकाली मंदिर येथील असणारा सोहम याचे गावांत जसे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच तो सध्या राहात असलेल्या "कोहिनूर हेरिटेज, सी विंग, डोंगरमळा, रत्नागिरी या सोसायटीतील वार्षिक कार्यक्रमात त्याने आपल्या कलागुणांने अनेकांची वाहवा मिळवली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65309 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top