महावितरण पावसाळापूर्व कामात मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण पावसाळापूर्व कामात मागे
महावितरण पावसाळापूर्व कामात मागे

महावितरण पावसाळापूर्व कामात मागे

sakal_logo
By

swt619.jpg
27188
सोनुर्लीः येथे वीजेच्या तारेला झाडांचा स्पर्श होऊन पडलेल्या ठिणग्यांनी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना विज कर्मचारी.
swt620.jpg
27189
सोनुर्लीः वीजेच्या तारावर वाढलेली झाडी.


महावितरण पावसाळापूर्व कामात मागे
सावंतवाडीत रोषः तक्रारी करुनही अधिकारी वर्गाचा याकडे कानाडोळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ः तौक्ते चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका बसूनही विज वितरण कंपनीकडून पावसाळ्यापुर्वी आवश्यक कामे करण्याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. सावंतवाडी तालुक्यात हेच चित्र असून तक्रारी करुनही अधिकारी वर्ग याकडे कानाडोळा करत आहेत. केवळ मलमपट्टी केल्याप्रमाणे दिखाऊपणाचे काम वीज विजवितरचे कर्मचारी करत आहेत. त्यामुळे गावागावात याबाबत ग्रामस्थातून प्रचंड रोष व्यक्त होत आहे.
तालुक्यात दरवर्षी विज वितरण कंपनीकडून खबरदारी म्हणून आवश्यक कामे केली जातात. यामध्ये विशेष करुन लाईनवर आलेली झाडे तोडण्याचे काम त्या-त्या गावातील लाईनमन, वायरमन यांच्यामार्फत केले जाते. पावसाळ्यात झाडीमुळे विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये, ग्राहकांना अखंडित विज पुरवठ्याची सेवा मिळावी, हा या मागचा मुख्य हेतू आहे. गतवर्षी आलेल्या तौक्ते चक्रीवादळात वीज वितरणला मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागला. लाईनवर आलेली झाडे फांद्या न तोडल्यामुळे अधिकचा फटका या वादळात पाहायला मिळाला होता. मात्र, असे असूनही यावर्षी आवश्यक खबरदारी घेण्यात महावितरण गंभीर दिसत नाही.
सावंतवाडी तालुक्याचा विचार करता बऱ्याच गावात काडीमात्र काम विज कर्मचाऱ्यांनी केलेले नाही. संपुर्ण लाईनवर झाडी आलेली असताना आणि याबाबत वारंवार अधिकाऱ्यांजवळ तक्रारी करुनही हे केले जात नाही. आता पावसाळा तोंडावर आला आहे. जराजरी पाऊस पडला तर बस्ती गुल अशी विज वितरणची परिस्थिती आहे. दरवेळी मेन लाईन नादुरुस्त अशी उत्तरे वारंवार ग्रामस्थांना ऐकवून विज वितरण आपल्या कामचुकारपणावर पांघरुण घालत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष आहे.
तालुक्यात कामे सुरु असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात गावागावात लाईनवरील झाडी तशीच आहे. त्यामुळे प्रत्येक गावातून विज वितरण विरोधात रोष व्यक्त होत आहे. बऱ्याच गावात तेथील विज कर्मचाऱ्याकडून खरोखरच चांगले काम केले आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी कर्मचारी कामचुकारपणा करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे अधिकारी वर्गाची त्यावरच वचक नसल्याचेच समोर आले आहे. वीज संदर्भात ग्रामस्थांना फारसे ज्ञान नसल्याने अमुक झाले तमुक झाले असे सांगून कर्मचारी वेळ मारुन नेतात. मुळात ज्या गावात त्यांची नेमणूक आहे, त्या गावात राहणे त्यांची जबाबदारी असताना बरेच कर्मचारी आपले जबाबदारी टाकून दुसरीकडे असतात. त्यामुळेच यावर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

कोट
सोनुर्ली गावात मोठ्या प्रमाणात लाईनवर झाडी वाढली आहेत. याबाबत वायरमनपासून वरिष्ठांचे वेळोवेळी लक्ष वेधले. मात्र, कोणीच दखल घेत नाही. दोन दिवसापूर्वी लाईनवरील झाडींमुळे स्पार्क होऊन वणवा पेटला. मात्र, तिथे वायरमन पोहोचल्यामुळे दुर्घटना टळली. वाढलेल्या झाडीमुळे विद्युत खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडत असून पावसाळ्यापुर्वी यात सुधारणा न केल्यास विज कार्यालयातच ठिय्या मांडणार आहे.
- संतोष ओटवणेकर, ग्रामपंचायत सदस्य, सोनुर्ली

कोट
मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून स्थानिक स्तरावर देण्यात आले आहेत. मात्र, ज्या भागात ज्या तालुक्यांमध्ये अशी कामे झाली नाहीत किंवा होत नसेल तर त्या भागात चौकशी करून तातडीने कामे करण्याबाबत सूचना देण्यात येतील.
- किशोर खोबरे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65313 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top