
राजापूर ःशालेय खरेदीसाठी पालकांची गर्दी
फोटो काल सोडला
...
-rat6p7.jpg
L26996
ः राजापूर ः विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या स्कूलबॅग.
--------------------
शालेय साहित्यासाठी बाजारात गर्दी
महागाईने त्रस्त; २० ते २५ टक्के दरवाढ, वह्यांच्या खरेदीवर भर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः नवीन शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार असल्याने पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. ऑफलाइन शाळा सुरू होणार असल्याने शैक्षणिक साहित्याने बाजारपेठ फुलली आहे; मात्र शैक्षणिक साहित्याच्या महागाईने पालकांचे कंबरडे मोडणार आहे.
ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना नेहमी आवश्यक असणारी वह्या-पुस्तके, दप्तर, छत्री-रेनकोट आणि अन्य शैक्षणिक साहित्य पालकांना खरेदी करावे लागले नव्हते; यावर्षी ऑफलाइन शाळा भरणार आहेत. त्याबाबतचे शिक्षण विभागासह शाळा प्रशासन यांनी नियोजन केले आहे. त्याच्या जोडीला पालकांसह आता विद्यार्थ्यांकडूनही नियोजन सुरू झाले आहे. त्यामध्ये ऑफलाइन शाळा भरणार असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याची खरेदी होणार आहे. ती डोळ्यासमोर ठेवून व्यापाऱ्यांनी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. बाजारपेठ शैक्षणिक साहित्याने गजबजली आहे. शाळा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य दाखल झाले आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या वह्या, छत्र्या, रेनकोट आणि अन्य शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे.
...
चौकट
दरात वीस-पंचवीस टक्क्यांची वाढ
शासनाकडून मोफत पुस्तके मिळत असली तरी मोफत वह्या मिळत नसल्याने आवश्यक असलेल्या वह्यांची विद्यार्थ्यांकडून खरेदी केली जात आहे. वह्यांच्या जोडीने विविध रंगबेरंगी आणि कंपन्यांचे रेनकोट, चप्पल, आकर्षक रंगाच्या छत्र्या, स्कूलबॅग, सॅकही बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. वॉटरप्रूफ असलेल्या स्कूलबॅगना पालकांकडून अधिक पसंती दिली जात आहे. शैक्षणिक साहित्य दरांमध्ये सुमारे वीस-पंचवीस टक्क्यांची वाढ झाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65325 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..