राजापूर ः राजापूरात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः  राजापूरात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम
राजापूर ः राजापूरात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम

राजापूर ः राजापूरात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम

sakal_logo
By

राजापूरात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम

प्रशासनाची तयारी सुरू; ४१ गावांमध्ये घडामोडींना वेग
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः गेल्या काही महिन्यांपासून प्रशासक कार्यरत असलेल्या तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसह या वर्षाच्या अखेरीला मुदत संपत असलेल्या ३१ अशा एकूण ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या संभाव्य निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून पूर्वतयारीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील निम्म्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून वाजू लागले आहेत.
तालुक्यातील सागवे, देवाचेगोठणे, वडदहसोळ, आंगले, भालावली, केळवली, मूर, राजवाडी, मोगरे, कोंड्येतर्फ सौंदळ या दहा ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या मुदती यापूर्वी संपल्या आहेत; मात्र, कोरोनामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे सद्यःस्थितीमध्ये या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांमार्फत सुरू आहे. त्याचवेळी तालुक्यातील तब्बल ३१ ग्रामपंचायतींच्या या वर्षअखेरीला मुदती संपणार आहेत. सद्यःस्थितीमध्ये कमी झालेल्या कोरोना महामारीमुळे या सर्व ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने निवडणूक पूर्वतयारीचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये प्रशासकांमार्फत सध्या कारभार पाहत असलेल्या दहा ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या अपडेट करण्याचे काम केले जात आहे. त्याचवेळी उर्वरित ३१ ग्रामपंचायतींच्या सदस्यांचे आरक्षण निश्‍चिती करण्याचे काम हाती घेतले आहे.
..
चौकट
मोर्चेबांधणीला सुरवात
या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्याच्या ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित होत असल्याने या निवडणुकांना राजकीय पक्षांकडून विशेष महत्व दिले जाते. त्यामुळे तालुक्यातील १०१ पैकी तब्बल ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून आतापासून मोर्चेबांधणीला सुरवात केल्याचे चित्र दिसत आहे.
...
चौकट
निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असलेल्या ग्रामपंचायती
सागवे, देवाचेगोठणे, वडदहसोळ, आंगले, भालावली, केळवली, मूर, राजवाडी, मोगरे, कोंड्येतर्फ सौंदळ, मिठगवाणे, नाणार, परूळे, शिवणे बुद्रुक, तळवडे, नाटे, साखर, वडवली, वाटूळ, डोंगर, कळसवली, साखरीनाटे, झर्ये, उपळे, शेजवली, प्रिंदावण, कोतापूर, देवीहसोळ, जैतापूर, हातिवले, ओझर, कोळवणखडी, जुवाठी, येळवण, पाचल, खरवते, माडबन, विल्ये, हसोळतर्फ सौंदळ, धाऊलवल्ली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65350 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top