तोंडवली-बावशी ग्रामपंचायत विरोधात मर्ये कुटुंबियांचे उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोंडवली-बावशी ग्रामपंचायत विरोधात मर्ये कुटुंबियांचे उपोषण
तोंडवली-बावशी ग्रामपंचायत विरोधात मर्ये कुटुंबियांचे उपोषण

तोंडवली-बावशी ग्रामपंचायत विरोधात मर्ये कुटुंबियांचे उपोषण

sakal_logo
By

swt६३३.jpg
२७१७२
सिंधुदुर्गनगरीः येथे उपोषणास बसलेले पुंडलिक मर्ये व कुटुंबिय.

तोंडवली - बावशी ग्रामपंचायत
विरोधात मर्ये कुटुंबियांचे उपोषण
रस्ता करताना नियम मोडल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः बावशी-तेलीवाडी ते बावशी मुख्य रस्त्याची २३ नंबरची नोंद रद्द व्हावी, न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत ग्रामपंचायतीने गट क्रमांक २५१ व २५२ मधून रस्ता करू नये, अशी मागणी करत ग्रामपंचायतविरोधात ग्रामस्थ पुंडलिक आत्माराम मर्ये यांनी जिल्हा परिषदसमोर आपल्या कुटुंबासहित बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
पुंडलिक मर्ये यांच्या म्हणण्यानुसार, बावशी-तेलीवाडी ते बावशी मुख्य रस्ता तयार करण्यासाठी तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. मात्र, हा रस्ता बनविताना तोंडवली ग्रामपंचायतीने अनेक नियम धाब्यावर बसवून रस्त्याचे काम पूर्ण असल्याचे दाखविल्याचा आरोप मेर्ये यांनी केला आहे. या ग्रामपंचायतीने मृत जमीनदार आणि ज्या जमिनीचा न्यायालयात वाद आहे, अशाही जमिनींची समंतीपत्रे तयार केल्याचा आरोप मर्ये यांनी केला आहे. चुकीच्या पद्धतीने गट नं. २५१ आणि २५२ मधील २३ नंबर ची नोंद रद्द व्हावी, न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत ग्रामपंचायतीने गट नं. २५१ व २५२ मधून रस्ता करू नये, अशी मागणी करत २३ मे पासून तोंडवली बावशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पुंडलिक मर्ये यांनी आमरण उपोषण केले होते. मात्र, त्याठिकाणी न्याय न मिळाल्याने मर्ये यांनी आजपासून जिल्हा परिषद समोर आपल्या कुटुंबासहित उपोषणाला सुरुवात केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65356 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top