
कणकवली : नगरपंचायत कारवाई
kan69.jpg
27216
कणकवली : शहरातील पटवर्धन चौक परिसरातील भाजी विक्रेत्यांवर नगरपंचायत पथकाने कारवाई केली.
--------------------
कणकवलीत रस्त्यालगत
भाजी विकणाऱ्यांवर कारवाई
कणकवली, ता. ६ : शहरातील बाजारपेठ रस्त्यालगत दुकाने थाटणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर आज नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. हॉटेल डायमंड समोर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांची भाजी व प्लॅस्टिक ट्रे जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे पादचारी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.
कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खाली भाजी विक्रेत्यांना जागा नेमून दिली होती. जेणेकरून सर्वच विक्रेते एका छत्राखाली आल्यामुळे सगळ्यांचाच व्यवसाय चांगला होईल व वाहतुकीस व पादचाऱ्यांना अडथळा होणार नाही. या दृष्टीने आमदार नितेश राणे यांनी देखील सर्व विक्रेत्यांची बैठक घेत शिस्त पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जर सर्वसामान्यांना त्रास होण्यासारखी दुकाने लावली गेली तर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेशही श्री राणे यांनी दिले होते. मात्र गेले दोन दिवस पुन्हा रस्त्यावर दुकाने थाटण्यास सुरुवात झाली होती. वारंवार सूचना देऊनही हे विक्रेते पुन्हा रस्त्यावर दुकाने थाटून भाजी विक्री करत असल्याने ही कारवाई केली. यापुढे अशीच कारवाई केली जाईल असा इशारा मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65416 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..