बांद्यात रविवारी ग्रंथपेट्यांचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात रविवारी ग्रंथपेट्यांचे वितरण
बांद्यात रविवारी ग्रंथपेट्यांचे वितरण

बांद्यात रविवारी ग्रंथपेट्यांचे वितरण

sakal_logo
By

swt७१९.jpg
२७४०९
दोडामार्गः येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना भाई परमेकर.

हळबे महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन
दोडामार्गः येथील हळबे महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नवनिर्माण शिक्षण संस्येचे सदस्य भाई परमेकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज पार्सेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत उपस्थित होते. विद्यार्थिनी पूजा पाटील हिने पोवाडा सदर करून उपस्थितांची मने जिंकली. श्री. परमेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य कर्तृत्वाची माहिती दिली. श्री. पार्सेकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्राचार्य सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, अठरापगड जातींना एकत्र आणण्याची कला, दूरदृष्टी आदी विविध पैलूंची माहिती दिली. प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय खडपकर यांनी तर आभार अस्मिता सावंत हिने मानले.
............
swt७१८.jpg
L२७४०८
बांदाः येथे ई-श्रम कार्डचे वाटप करताना मान्यवर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

ई-श्रम कार्डचे बांद्यात वाटप
बांदा, ता. ७ ः केंद्राच्या प्रधानमंत्री जनकल्याण योजनेमार्फत बांदा येथे मोफत ई-श्रम कार्ड बनविण्याचे शिबिर राबविण्यात आले होते. त्या कार्डचे वाटप नुकतेच येथील ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, योजनेचे प्रदेश सचिव नारायण सावंत, ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत, मकरंद तोरसकर, भाजप बांदा शहराध्यक्ष राजा सावंत, महिला शहराध्यक्षा सौ. अवंती पंडित, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. लक्ष्मी सावंत, ज्ञानेश्वर सावंत, संदेश महाले, नीलेश देसाई आदी उपस्थित होते.
...................
बांद्यात रविवारी ग्रंथपेट्यांचे वितरण
बांदा, ता. ७ ः येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या दहावी १९६७ च्या बॅचतर्फे पाच ग्रंथपेट्यांचे वितरण प्रशाळेत रविवारी (ता. १२) करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रंथापेटीत १०० ग्रंथांचा संग्रह असणार आहे. दहावीची बॅच व नाशिक येथील ''ग्रंथ तुमच्या दारी'' यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बॅचचे गेट टुगेदर आयोजित केले आहे. ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे संस्थापक विनायक रानडे, सिडनहॅम कॉलेज, मुंबईचे माजी प्राचार्य डॉ. शंकर मोडक व इतर सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सर्व ग्रंथप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किशोर केसरकर यांच्याशी संपर्क साधावा.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65563 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top