शिवाजी महाराजांना ओरोसमध्ये अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी महाराजांना
ओरोसमध्ये अभिवादन
शिवाजी महाराजांना ओरोसमध्ये अभिवादन

शिवाजी महाराजांना ओरोसमध्ये अभिवादन

sakal_logo
By

27403
ओरोस ः येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पणप्रसंगी हिंद मराठा संघचे पदाधिकारी.

छत्रपती शिवाजी महाराजांना
ओरोसमध्ये अभिवादन
कुडाळ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ओरोस येथील त्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास हिंद मराठा संघ, सिंधुदुर्गच्यावतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हिंद-मराठा महासंघ (रजि.) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्यावतीने हा पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सचिव दादा साईल, कार्यकारणी सदस्य प्रसाद गावडे, संतोष वालावलकर, संदीप साटम, सुप्रिया वालावलकर, देवेंद्र सामंत, योगेश घाडी, पांडू मालवणकर, तुषार सावंत, आनंद उर्फ दादा परब, तेजस माने, साईप्रसाद भोई आदी उपस्थित होते. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा घोषणा देण्यात आल्या.
--
27414
सावंतवाडी ः छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना संजू परब. शेजारी दत्ताराम सडेकर, विशाल परब आदी.

सावंतवाडीत ‘शिवराज्याभिषेक’
सावंतवाडी ः सावंतवाडी-दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजू परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार-विचारानुसार आम्ही कार्यरत आहोत. त्यांच्या विचाराने काम करणार आहोत, असे स्पष्ट केले. गावागावात ६ जून या दिवशी राज्याभिषेक दिन साजरा करण्यात यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यानिमित्त शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूनव अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला. तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी मंडळाचे संस्थापक सचिव दत्ताराम सडेकर, सचिव अॅड. संतोष सावंत, खजिनदार भूपेंद्र सावंत, साई हवालदार, विनोद सावंत, सुहासिनी सडेकर, पंढरी राऊळ, हिंद मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब, अमित परब, अभी पंडित, नागेश पाटील आदी उपस्थित होते.
-------

२७४०७
समर्थ पाटील

वेशभूषा स्पर्धेत समर्थ द्वितीय
बांदा ः शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शाहू वेशभूषा स्पर्धेमध्ये येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेचा विद्यार्थी समर्थ पाटील याने लहान गटातून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. अष्टपैलू संस्कृती, मुंबई या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती. समर्थ हा केंद्रशाळा नंबर १ मध्ये पहिलीमध्ये शिकत आहे. मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्ग शिक्षिका शुभेच्छा सावंत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. बांदा सरपंच अक्रम खान आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच विविधस्तरातून समर्थवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
..............
महावितरणची टिम आज मालवणात
मालवण : शहर व परिसरातील वीज ग्राहक व नागरिकांच्या समस्या अथवा प्रलंबित तक्रारी असल्यास त्या जाणून घेण्यासाठी तसेच ज्या समस्या तत्काळ सोडवणे शक्य आहे त्या ऑन दि स्पॉट सोडवण्यासाठी अधीक्षक अभियंता कणकवली व अधिकारी टीम उद्या (ता.८) सकाळी अकराला येथील महावितरण कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या मागणीनुसार महावितरणच्या माध्यमातून ही कार्यवाही करण्यात येत आहे. तरी ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका शिवसेना व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी केले आहे.
--
भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार
वेंगुर्ले ः गोवा राज्याच्या निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या सहभागाबाबत प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे तसेच गोवा राज्याचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी त्यांचे कौतुक करून सन्मान केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे सरचिटणीस प्रसन्ना देसाई, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बाळू प्रभू तसेच तुळसचे माजी सरपंच विजय रेडकर यांचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65564 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top