क्षत्रिय मराठा समाजतर्फे घाडीगावकर यांना मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षत्रिय मराठा समाजतर्फे घाडीगावकर यांना मदत
क्षत्रिय मराठा समाजतर्फे घाडीगावकर यांना मदत

क्षत्रिय मराठा समाजतर्फे घाडीगावकर यांना मदत

sakal_logo
By

swt715.jpg
27405
त्रिंबकः येथील स्नेहल घाडीगांवकरला आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली.


क्षत्रिय मराठा समाजतर्फे
घाडीगावकर यांना मदत
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ७ः क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज मुंबईच्या सिंधुदुर्ग विभागाने आपत्कालीन निधीमधून पहिली आपत्कालीन मदत त्रिंबक येथील स्नेहल विठ्ठल घाडीगांवकर यांना देण्यात आली. मदतीचा धनादेश त्यांना सिंधुदुर्ग विभागाचे विजय गांवकर, सुर्यकांत घाडी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत सदानंद घाडीगांवकर, अर्जुन बापर्डेकर, सुनील गांवकर, सत्यवान गांवकर, विष्णू तावडे तसेच स्नेहल यांचे पती विठ्ठल घाडीगांवकर आदी उपस्थित होते.
नव-याला झालेल्या अपघाताचा धक्का घेऊन स्नेहल या कोमात गेल्या होत्या. स्नेहल यांना इस्पितळात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृति सुधारत आहे. त्यांच्यावरील उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी क्षत्रिय मराठा घाडीगांवकर समाज, विभाग सिंधुदूर्गकडून आर्थिक मदत देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65565 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top