ग्राहकसेवेसाठी महावितरण सदैव तत्पर - विनोद पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहकसेवेसाठी महावितरण सदैव तत्पर - विनोद पाटील
ग्राहकसेवेसाठी महावितरण सदैव तत्पर - विनोद पाटील

ग्राहकसेवेसाठी महावितरण सदैव तत्पर - विनोद पाटील

sakal_logo
By

swt७२२.jpg
27442
कुडाळः सिंधुदुर्ग मंडलच्या १७ व्या वर्धापन दिनाचे उद्धाटन करताना अधीक्षक अभियंता विनोद पाटील. सोबत रमेश लोकरे, विनोद विपर, बाळासाहेब मोहिते, नीलेश आंबेकर, सुनील गोसावी, अधिकारी व कर्मचारी. (छायाचित्रः अजय सावंत)

ग्राहकसेवेसाठी महावितरण सदैव तत्पर
विनोद पाटीलः कुडाळमध्ये सिंधुदुर्ग मंडलचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ः समृद्धीचे, विकासाचे पर्व घेऊन ग्राहकांच्या सेवेसाठी वीज वितरण सदैव तत्पर आहे. वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळावा सुखद आनंद देणारा आहे, असे प्रतिपादन अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सिंधुदुर्ग मंडलचा १७ वा वर्धापन दिन सोमवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या सोहळ्यात कोल्हापूर येथील ''इश्क सुफियाना'' यांनी गायन, वादन, नृत्याविष्काराने अधिक रंगत आणली.
येथील मराठा समाज हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. सोहळ्याचे उद्घाटन अधीक्षक अभियंता पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता रमेश लोकरे, विनोद विपर, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, कणकवली संयुक्त सचिव, वर्कर्स फेडरेशनचे बाळ पवार, संयुक्त सचिव, वर्कर्स फेडरेशन झोनल अध्यक्ष, मागासवर्गीय नीलेश आंबेकर, झोनल अध्यक्ष, मागासवर्गीय कामगार संघटन झोनल अध्यक्ष, कामगार महासंघ विनय लांजेकर मंडल सचिव, सचआर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन बबन बोंगाळे, मंडल सचिव मागासवर्गीय कामगार संघटन सुनील गोसावी मंडल सचिव, वर्कर्स फेडरेशन दिनेश सावंत, प्रमोद कविटकर मंडल सचिव, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सतीश नाईक, मंडल सचिव, कामगार महासंघ कृष्णात बच्चे, व्यवस्थापक (मास) मानव संसाधन श्रावणी कांबळे, उपव्यवस्थापन आलेखा शारबिद्रे, सहाय्यक अभियंता शिल्पा निशाणदार, कनिष्ठ अभियंता प्रगती परसगडे, उच्चस्तर लिपीक प्रिया अवसरे, विद्युत साहाय्यक पूनम तायडे, मुख्य तंत्रज्ञ संजय गोसावी, प्रधान यंत्रचालक प्रमोद कविटकर, वरिष्ठ तंत्रज्ञ श्रीराम सडवेलकर, वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. नितीन मारगुडे, आनंद लाड, सहदेव सावंत, संतोष कुलकर्णी, गजानन पाटील, श्री. परब, सुमित्रा पाटील, सोनाली विपर, लीना गोसावी, ज्योत्स्ना कामत, वृषाली चव्हाण उपस्थित होते.

चौकट
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धरला ठेका
सकाळ व दुपारच्या सत्रातील कार्यक्रमांनंतर जीतू पाटील प्रस्तुत इश्क सुफियाना, कोल्हापूरचा विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रम मराठा समाजाच्या रंगमंचावर झाला. विविधांगी नृत्याविष्कार, मिमिक्री, गायन, वादन आदींनी हा सोहळा रंगतदार ठरला. या सोहळ्यात अभिनेत्री व गायिका नम्रता सुतार, जीतू पाटील, माधुरी पाटील, प्रसाद कुलकर्णी, पी. कुमार यांनी विविध गाणी सादर करीत रसिकांची वाहवा मिळविली. संगीत साथ सुधीर सुतार, सनी लोहार, शिवाजी बुचडे, प्रकाश गवळी यांनी दिली. शीतल मुंबईकर, श्रद्धा शुक्ल (केडीसीटीम), अविनाश गायकवाड यांनी नृत्याविष्कार सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. निवेदन प्रसाद कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सांगतेवेळी ''झिंगाट''च्या ''झिंगझिगाट''वर अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासह कर्मचारी वर्गानेही ठेका धरला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65594 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top