कणकवली उपविभागात पथदीपांचे ८ कोटी थकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली उपविभागात पथदीपांचे ८ कोटी थकले
कणकवली उपविभागात पथदीपांचे ८ कोटी थकले

कणकवली उपविभागात पथदीपांचे ८ कोटी थकले

sakal_logo
By

पथदीपांचे ८ कोटी थकले

कणकवली उपविभाग; काही गावात वीज जोडण्या तोडल्या

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ ः येथील उपविभागातील चारही तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील वीज बिल थकबाकी तब्बल ७ कोटी ८० लाख रुपये इतके आहे. कणकवली तालुक्यात दोन कोटी ८० लाख रूपये सर्वाधिक थकबाकी राहिल्याने बहुतांशी गावातील पथदिप सध्या बंद आहेत. कणकवली उपविभागात एकूण १६ कोटीची बिले थकली आहेत. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे.
कणकवली उपविभागातील देवगड, मालवण, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीत पथदिपांची वीज बिले थकीत आहेत. वीज भरणा करणार नाही, अशी काहींनी भूमिका घेतली होती. त्यानंतर वीज वितरण कंपनीने हळूहळू थकीत झालेल्या ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे. चार तालुक्यांमध्ये कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायतींची थकबाकी दोन कोटी ८० लाख रूपये इतकी आहे. चारही तालुक्यातील नगरपंचायती आणि महामार्ग प्राधिकरणाने स्ट्रीट लाइटचे बिल अदा केले आहे.
राज्याच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर गेल्या काही वर्षापासून स्ट्रीट लाईट पुरवठा करण्यात आला. आता गावागावांमध्ये ग्रामपंचायत पातळीवर स्ट्रीट लाईट देण्यात आली आहे. त्यामुळे गाव उजळून निघाले होते. सुरुवातीच्या काळामध्ये राज्याने स्ट्रीट लाईटसाठी अनुदान व्यवस्था केल्याने थेट वीज वितरण कंपनीला हे अनुदान जमा केले जात होते. त्यामुळे काही वर्षे वीज बिल थकीत राहत नव्हते. त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावर घरपट्टीमधून दिवाबत्ती कर (स्ट्रीट लाइट बील) आकारणी सुरू झाली. तरीही ग्रामपंचायत स्तरावर १४ व्या वित्त आयोगातून स्ट्रीट लाईट बिल भरणा करण्याची सुविधा होती. मात्र, एप्रिल २०२१ पूर्वी शासनाने जे अनुदान पंचायत समिती स्तरावर दिले होते, त्यातील काही विज बिल पंचायत समिती स्तरावरील बिडिओमार्फत वीज वितरण कंपनीला भरणा करण्यात आले. मात्र, एप्रिल २०२१ पासून राज्याने ग्रामपंचायत स्तरावरील अनुदानातून किंवा पथदीप कर आकारणी करून वीज वितरण कंपनीला स्ट्रीट लाइट बील भरावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात जमा झालेल्या पथदीप कर ग्रामपंचायतीने भरणा केलेल्या नाही. राज्याकडे वीज वितरण कंपनीला देय असलेली रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जात आहे. मात्र, ग्रामपंचायत आपल्या अनुदानातून स्ट्रीट लाइट कनेक्शन जोडून दिले जात आहेत. मात्र, ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी दुर्लक्ष केल्याने घरपट्टीतून दिवाबत्ती कर आकारला जात असतानाही वीज वितरण कंपनीकडे वीज बिल भरणा केला जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील स्ट्रीट लाईट बिल मोठ्या प्रमाणात थकीत राहिले आहेत. अशा थकित वीज बिलाची स्ट्रीट लाइट जोड तोडण्याचा सपाटा वीज वितरण कंपनीने सुरू केल्याने बहुतांशी गावातील रस्ते आता अंधाराच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. पावसाळ्यात महावितरणकडून स्ट्रीटलाइट बंद केली जात असल्याने गावात नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. ग्रामपंचायत जर घरपट्टीच्या माध्यमातून दिवाबत्ती कर वसूल करत असेल तर तो दिवाबत्ती कर महावितरणला भरणा करणे अपेक्षित आहे; मात्र, तसे होत नसल्याने बहुतांशी गावे अंधाराच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत.
----------
कोट
ग्रामपंचायतींच्या मागणीनुसारच ममहावितरणने स्ट्रीट लाइटचा पुरवठा केला आहे. यासाठी लागणारे साहित्य यापूर्वी कंपनीकडून दिले जात होते. शासनाकडून अनुदान मिळत होते. त्यामुळे वीजबिल भरणा होत होते. मात्र, वर्षभरामध्ये राज्य शासनाने आदेश काढून ग्रामपंचायतीने वीज बिल भरणा करावे अशा सूचना आहेत. त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवकांनी तातडीने बिल भरावे अन्यथा स्ट्रीटलाइटची वीज तोडली जाईल.
- बाळासाहेब मोहिते, कार्यकारी अभियंता, वीज वितरण
--------------
महावितरण म्हणते...
- एकूण थकबाकी - १६ कोटी
- पथदीप मिटर - १२३०
- कणकवलीत २ कोटी ८० लाख थकित
- बहुतांश तालुक्यात बिलांची रक्कम थकली

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65595 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top