
रवळनाथ हौसिंग''च्या नवीन शाखांना मंजुरी
swt७२५.jpg
२७४७२
एम. एल. चौगुले
‘रवळनाथ हौसिंग’च्या
नवीन शाखांना मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ः श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि. आजरा (मल्टी-स्टेट) या संस्थेला सांगली, कराड व पुणे या ठिकाणी शाखा सुरू करण्यास सहकार खात्याच्या केंद्रीय निबंधकांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.
श्री. चौगुले म्हणाले की, सध्या संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील बेळगाव, धारवाड जिल्हा असे संस्थेचे कार्यक्षेत्र असून, दिल्ली व गोवा या राज्याच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यास परवानगी मागितली आहे. त्यालाही लवकरच मान्यता मिळेल. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, सुविधा केंद्र-गडहिंग्लज, बेळगाव जिल्ह्यात बेळगाव, निपाणी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ अशा १० शाखा आहेत. संस्थेचे प्रधान कार्यालय गडहिंग्लज येथे आहे.
३१ मे अखेर संस्थेची सभासद संख्या ९४०७, ठेवी ३५० कोटी रुपये, कर्जे २४८ कोटी, भागभांडवल ११ कोटी, गुंतवणूक १२५ कोटी, निधी १३ कोटी रुपये आहे. मार्च २०२२ अखेर संस्थेची वार्षिक उलाढाल १७०३ कोटीची झाला असून, १ कोटी ८८ लाख नफा झाला आहे, अशी माहिती चौगुले यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव, प्राचार्य आर. एस. निळपणकर, महेश मजती, सीईओ डी. के. मायदेव आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65625 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..