राजेश बेंडल यांना आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजेश बेंडल यांना आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार
राजेश बेंडल यांना आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार

राजेश बेंडल यांना आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार

sakal_logo
By

rat७p४.jpः
२७३८५
गुहागरः मडगाव गोवा येथे आदर्श नगराध्यक्ष पुरस्काराने राजेश बेंडल यांचा गौरव करताना श्रीपाद नाईक आणि मान्यवर.

राजेश बेंडल यांना आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार
गुहागरचे कारभारी; केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी गौरविले
गुहागर, ता. ८ः नगराध्यक्ष राजेश बेंडल यांना राष्ट्रीय आदर्श नगराध्यक्ष या पुरस्काराने गौरवण्यात आले. गोव्यातील मडगाव येथे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन राजेश बेंडल यांचा सत्कार केला. हा सन्मान गुहागर शहरातील नागरिक, समाज संघटना, शहर विकास आघाडी आणि गुहागर नगरपंचायतीमधील सर्व नगरसेवक, अधिकारी कर्मचारी यांचा असल्याचे राजेश बेंडल यांनी सांगितले.
हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड आणि श्री स्वामी समर्थ मंदिर, समर्थगड मडगाव गोवा यांच्यावतीने महाराष्ट्र आणि गोव्यासह अन्य राज्यातील २१ व्यक्तींचा सत्कार मडगावमध्ये करण्यात आला. या वेळी गोव्यातील आमदार उल्हास तुयेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, डॉ. सुनील फडतरे, गौरव नायकवाडी उपस्थित होते. सत्कारमूर्तींमध्ये समाजसेवक, आयुर्वेदाचार्य, डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक, उद्योजक, शेतकरी, शिक्षक आदी क्षेत्रातील, सर्व जाती धर्मातील, वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. समाजातील विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींना गेली तीन वर्षे ही संस्था मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देत आहे.
राजेश बेंडल यांचा राजकीय प्रवास पंचायत समिती सदस्य, उपसभापती, सभापती असा झाला. या काळात त्यांनी गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागरी क्षेत्रात काम करताना गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागात विकासकामे केली. अनुभवाच्या बळावर केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधून निधी आणला. त्याबद्दल त्यांना आदर्श नगराध्यक्ष पुरस्काराने गौरवण्यात येत असल्याचे हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराडचे अध्यक्ष डॉ. सुनील फडतरे यांनी सांगितले.
या पुरस्काराबद्दल नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, नगराध्यक्ष होण्याची संधी गुहागरमधील नागरिकांनी, गुहागर असगोली समाज संघटना आणि शहर विकास आघाडीमुळे मिळाली. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे. कोणावरही आरोप न करता, कोणालाही दोष न देता, शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. आज मिळालेल्या पुरस्काराने आपण योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने वाटचाल करत आहोत, हे अधोरेखित झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65668 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top