प्रौढ दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षणासह पुनर्वसनासाठी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रौढ दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षणासह पुनर्वसनासाठी मेळावा
प्रौढ दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षणासह पुनर्वसनासाठी मेळावा

प्रौढ दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षणासह पुनर्वसनासाठी मेळावा

sakal_logo
By

rat७p२०.jpg
27457
रत्नागिरीः दिव्यांगांसाठी आयोजित मूल्यमापन, रोजगार मेळाव्यात जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव यांचे स्वागत करताना सीए बिपीन शाह. डावीकडून दीप्ती भाटकर, संपदा जोशी. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)

दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षण, पुनर्वसनासाठी मेळावा
शिबिराला प्रतिसाद ; रोजगाराची संधीवर कार्यशाळा
रत्नागिरी, ता. ८ ः आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करताना प्रथम सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित गटाच्या शिक्षण, प्रशिक्षणासह रोजगाराची समान संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून प्रौढ दिव्यांगांचे व्यावसायिक पुनर्वसन करण्यासाठी आज आविष्कार संस्थेत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. यात ६० हून अधिक दिव्यांग, संस्थांनी भाग घेतला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आविष्कार संस्थेने याचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी मूल्यमापन व रोजगार/स्वयंरोजगार मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी यादव यांनी आविष्कार शाळा, कार्यशाळेला भेट देऊन कौतुक केले. दिव्यांगांच्या पालकांची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे. त्या द्वारेच ते समाजात उभे राहू शकणार आहेत. याकरिता जिल्हा परिषद १०० टक्के मदत, सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.
या मेळाव्यामध्ये संस्था प्रतिनिधी व व्यावसायिक यांच्यासाठी रोजगाराची संधी या विषयावरील कार्यशाळा तसेच प्रौढ दिव्यांग व्यक्तीकरिता मूल्यमापन व विविध क्षेत्रातील रोजगार संधीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. क्षेत्र अधिकारी व समुपदेशक किशोर साखळे आणि श्रम आणि रोजगार मंत्रालयातील सहाय्यक फायनान्स असिस्टंट नितीन जंगम यांनी मार्गदर्शन केले. विविध दिव्यांगांसाठी राष्ट्रीय करिअर सेवा केंद्र कार्यरत आहे. हा विभाग १५ ते ५० वयोगटातील सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक पुनर्वसनाच्या क्षेत्रात काम करतो. मजुरी सशुल्क रोजगार, स्वयंरोजगार आणि कुशल प्रशिक्षण आणि व्यावसायिक पुनर्वसनासाठी प्रौढ दिव्यांगांचे मानसिक, व्यावसायिक, शैक्षणिक मूल्यांकन केले जाते. १९६८ पासून महाराष्ट्र, गोवा आणि दमणमध्येही कार्यरत आहे. मुंबईत व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधाही आहे, अशी माहिती देण्यात आली.
या वेळी सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, आविष्कार संस्थेचे अध्यक्ष सी. ए. बिपीन शाह, उपाध्यक्ष दीप्ती भाटकर, सचिव संपदा जोशी, सचिन सारोळकर, नितीन कानविंदे, आविष्कार शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जोशी, सचिन वायंगणकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65674 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top