नव्या प्रभागरचनेस खारेपाटणमध्ये आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या प्रभागरचनेस खारेपाटणमध्ये आक्षेप
नव्या प्रभागरचनेस खारेपाटणमध्ये आक्षेप

नव्या प्रभागरचनेस खारेपाटणमध्ये आक्षेप

sakal_logo
By

27492
खारेपाटण : प्रभागरचनेबाबत येथे झालेली ग्रामसभा.


प्रभागरचनेस खारेपाटणला आक्षेप
---
ग्रामसभा गाजली; विश्‍वासात न घेता आरक्षण सोडत काढल्‍याचा आरोप
खारेपाटण, ता. ७ : ग्रामपंचायतीच्या विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्‍या अनुषंगाने प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत ग्रामस्थांनी आरक्षण प्रक्रिया आणि सोडतीला तीव्र विरोध केला. ग्रामस्थांना कोणत्‍याही प्रकारे विश्‍वासात न घेता चुकीच्या पद्धतीने प्रभागरचना करण्यात आली. तसेच, जेथे जास्त लोकसंख्या आहे, तेथे कमी उमेदवार दिल्‍याचाही आरोप ग्रामस्थांनी केला.
कणकवली तहसीलदारांनी नियुक्‍त केलेले अधिकारी तथा कृषी अधिकारी धीरज तोरणे यांच्या अध्यक्षतेखाली खारेपाटणची ग्रामसभा झाली. यात सरपंच रमाकांत राऊत, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव, योगेश पाटणकर, शमशुद्दीन काझी, अंजली कुबल, उज्ज्वला चिके, आरती कर्ले, सोनल लोकरे, आशा ब्रह्मदंडे यांच्यासह माजी सरपंच लियाकत काझी, सामाजिक कार्यकर्ते गफार काझी, संतोष पाटणकर, मंगेश गुरव, व्यापारी असोसिशनचे माजी अध्यक्ष सुधीर कुबल, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष विजय देसाई, राजेंद्र वरूणकर, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत अधिकाऱ्यांनी आरक्षण आणि सोडत प्रक्रियेबाबत माहिती दिल्‍यावर ग्रामस्थांनी त्‍यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. पूर्वीची प्रभागरचना का बदलली? नवी प्रभागरचना करताना ग्रामस्थांना विश्वासात का घेतले नाही? असे प्रश्‍न ग्रामस्थ गफार काझी यांनी अध्यासी अधिकारी तथा ग्रामसभेच्या अध्यक्षांना केले. तर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी आरक्षण सोडत प्रक्रियेला विरोध करीत येथील अनुसूचित जाती तथा बौद्ध बांधवांवर ग्रामपंचायत स्थापनेपासून अन्याय झाला असून, सरपंचपद हे ५० वर्षांच्या कालावधीत एकदाही अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेले नाही किंवा अनुसूचित जातीचे आरक्षण पडलेले नाही. त्यामुळे प्रभागरचनेसह आरक्षण सोडत प्रक्रियेलाही विरोध असल्याचे सांगितले.
---
ग्रामस्थांची मागणी
प्रभाग तीनमध्ये मतदार ९३५ असतानाही तेथे केवळ दोन उमेदवार दिले आहेत. याला काझीवाडी, संभाजीनगर ग्रामस्थांनी विरोध केला. येथे पूर्वीप्रमाणे तीन उमेदवार द्यावेत, अशी मागणी केली; तर लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग उमेदवार संख्या ठेवणे, कमी करू नये, सध्याची ग्रामपंचायतीची असलेली लोकसंख्या ही फार कमी गृहीत धरली असून, अधिकृत सर्व्हे केल्यास ती अधिक आढळेल. त्यामुळे ग्रामपंचायतीची उमेदवार संख्या ११ आहे, ती २ ने वाढवून १३ करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.
---
ग्रामपंचायत निवडणूक प्रभागरचना नमुना परिशिष्ट- २ यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, त्यावेळी ग्रामस्थांनी हरकत घ्यायला हवी होती. तरीही ज्या काही हरकती असतील, त्याचा प्रशासनातर्फे विचार करू. तसेच, पुन्हा ग्रामस्थांशी चर्चेअंती ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करू.
- एस. व्ही. राठोड, नायब तहसीलदार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65676 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top