गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे यश
गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे यश

गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे यश

sakal_logo
By

swt७३०.jpg
२७४९६
कनिष्का केणी, किमया परब

गणित परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे यश
बांदाः महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्यावतीने एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील पाचवीच्या विद्यार्थिनी कनिष्का केणी व किमया परब यांनी राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेत सुयश प्राप्त केले. या परीक्षेत शिष्यवृत्ती, मेडल व प्रमाणपत्रधारक होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. दरवर्षी महाराष्ट्र राज्य व सिंधुदुर्ग जिल्हा गणित मंडळ यांच्यावतीने गणित संबोध, गणित प्राविण्य व गणित प्रज्ञा या परीक्षेचे पाचवी व आठवीसाठी आयोजन करण्यात येते. संबोध व प्राविण्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रज्ञा या राज्यस्तरीय परीक्षेला बसण्याची संधी प्राप्त होते. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक जे. डी. पाटील, सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, लुईजा गोन्सालविस, रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शीतल गवस, प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, नीलेश मोरजकर, श्रद्धा नार्वेकर, सरपंच अक्रम खान, संदीप गवस, दुर्वा साळगावकर, कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65678 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top