मंडणगड ः आयत्यावेळी महत्वाच्या विषयांना बगल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड ः आयत्यावेळी महत्वाच्या विषयांना बगल
मंडणगड ः आयत्यावेळी महत्वाच्या विषयांना बगल

मंडणगड ः आयत्यावेळी महत्वाच्या विषयांना बगल

sakal_logo
By

मंडणगड नगरपंचायत सभेत गदारोळ

सभाशास्त्राला हरताळ फासल्याचा विरोधकांचा आरोप; महत्वाच्या विषयांना बगल, पोलिस बोलावण्याची वेळ
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ ः मंडणगड नगरपंचायतीत सत्ताधारी आयत्यावेळीचे विषयांमध्ये नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या व सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्यास व त्यावर मार्ग काढण्यास अनुत्सुकच असून अशा विषयांना बगल देत आहेत. या आधी झालेल्या दोन्ही सभांमध्ये आम्ही आयत्यावेळी येणाऱ्या महत्वाच्या विषयावर सत्ताधाऱ्यांची अनुत्सुकता अनाकलनीय असल्याचे विरोधी गटाचे गटनेता विनोद जाधव यांनी सांगितले.
नगरपंचायतीचे २७ मे रोजी तहकूब झालेली मंडणगड नगरपंचायतीची सभा ६ जूनला पार पडली. सभेच्या समारोपास सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष उफाळून आल्याने या ठिकाणी पोलिसांना पाचरण करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली असून, पोलिसांचे सभास्थळ आगमन होण्यापूर्वीच सभा संपली. सभाशास्त्राला हरताळ फासून नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा पार पडत असल्याचा आरोप विरोधक गेल्या तीन महिन्यांपासून जाहीरपणे करीत असताना ६ जूनला झालेली सभाही त्यास अपवाद ठरली नाही.
गेल्या तीन महिन्यांपासून शहरात गाजत असलेला पथदिव्यांचा प्रश्नच सभेतील गदारोळास कारणीभूत ठरल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या संदर्भात विरोधी पक्षाचे गटनेते नगरसेवक विनोद जाधव यानी दिलेल्या माहितीनुसार, सभेस उपस्थित उपनगराध्यक्षांनी पथदिव्याचे वितरणासंदर्भात विरोधी गटातील एका नगरसेविकेने नगरपंचायतीने दिलेले पथदिव्यांचा वापर नगरपंचायत कार्यक्षेत्राबाहेर करण्यात आल्याचे वक्तव्य करण्यात आल्याने सभेत गदारोळच झाला. या वेळी विरोधकांनी पथदिव्यांचा चुकीचा वापर होत असल्यास त्रयस्थ समिती नेमून झाल्या प्रकाराची चौकशी कऱण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी नाकारला. या वेळी नगराध्यक्षा व विरोधक नगरसेवकांमध्ये झालेला वाद पोलिस बंदोबस्ताच्या मागणीपर्यंत पोहचला. सुदैवाने पोलिस येण्यापूर्वीच सभा संपल्याने पोलिस बंदोबस्तात सभेचे कामकाज राबवण्याची नामुष्की टळली.
--------------------------
चौकट
सत्ताधाऱ्यांना उत्सुकता नाही
या सभेत शहरातील मोकाट कुत्रे व माकडांचा प्रश्न, याचबरोबर पावसाळी आपत्तीची तयारी व कचऱ्यामुळे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील पशुधनाचे झालेला नुकसान या विषयांकडे लक्ष वेधूनही सत्ताधाऱ्यांनी या विषयावर काम करण्यास कोणतीही उत्सुकता दाखवलेली नसल्याचे सांगितले. या संदर्भात नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांच्याशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, या संदर्भात नगराध्यक्ष मंडणगड येथे नसल्याने त्यांच्याशी चर्चा करून नंतर प्रतिक्रिया देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65711 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top