शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवा
शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवा

शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवा

sakal_logo
By

27532
बांदा ः शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर व शिवप्रेमी.

शिवरायांचे विचार घराघरांत पोहोचवा

अनिल गवस ः शिवराज्याभिषेक दिन बांद्यात उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांचे वहन करण्यासाठी शालेय पातळीवर विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आवश्यक आहे. नाटिकांमधून विद्यार्थ्यांना छत्रपतींचे विचार देऊन प्रेरित करा, तरच खऱ्या अर्थाने महाराजांचे कार्य व विचार मनामनांत व घराघरांत पोहोचतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस यांनी येथे केले.
येथील शिवतेज सेवा संस्थेच्यावतीने जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून गवस बोलत होते. यावेळी पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक व धार्मिक पद्धतीने सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक करण्यात आला. श्री. गवस यांनी शिवविचारांबाबत इतिहासातील विविध विषयांचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंचे, त्यांच्यातील उत्कृष्ट व्यवस्थापनाचे दाखले दिले. युवराज लखमराजे यांनी, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट शासक होते. रयतेच्या मनातील जाणणारे जाणते राजे होते. त्यांच्या कुशल कार्यपद्धतीमुळेच स्वराज्याचा विस्तार झाला. त्यांचे कार्य व विचार आताच्या पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे, असे सांगितले. भूषण सावंत यांनी प्रास्ताविक केले. रिना मोरजकर यांनी सूत्रसंचालन केले. समीर परब यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अन्वर खान, केंद्रप्रमुख संदीप गवस, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, संस्थेचे अध्यक्ष अॅड. विठ्ठल परब, सचिव अनुज बांदेकर, उपाध्यक्ष तेजस परब, नीलेश मोरजकर, केदार कणबर्गी, प्रशांत गवस, प्रथमेश राणे, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, संतोष मंझिलकर, जयेश म्हाडगूत, नीलेश सावंत, निखिल तानावडे, अजय आरोसकर, रंगनाथ परब, सरोज नाईक, ऊर्मिला मोर्ये, शुभेच्छा सावंत, दीक्षा गवस, आर्या पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65728 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top