रत्नागिरी ः आव्हाने पेलण्यासाठी महावितरणने सज्ज राहावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः आव्हाने पेलण्यासाठी महावितरणने सज्ज राहावे
रत्नागिरी ः आव्हाने पेलण्यासाठी महावितरणने सज्ज राहावे

रत्नागिरी ः आव्हाने पेलण्यासाठी महावितरणने सज्ज राहावे

sakal_logo
By

आव्हाने पेलण्यासाठी महावितरणने
सज्ज राहावे ःविजय भटकर
रत्नागिरी, ता. ७ ः महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक आव्हानाचा समर्थपणे सामना केला आहे. महावितरण कंपनीच्या प्रगतीसाठी पुढील काळातही नवी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज राहावे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता विजय भटकर यांनी केले.
रत्नागिरी मंडळात महावितरणचा १७ वा वर्धापनदिन सोमवारी साजरा करण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भटकर यांनी या वेळी वीज कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक करून सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक वैभव थोरात, अधीक्षक अभियंता (प्र.) नितीन पळसुलेदेसाई, अधीक्षक अभियंता (पा. आ.) कल्पना पाटील, कार्यकारी अभियंता (प्रशासन) राजश्री मोरे, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, कैलास लवेकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी (प्र.) आप्पासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्धापनदिनाच्या निमित्ताने कौटुंबिक स्नेहसंम्मेलन कार्यक्रम थाटात झाला. महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित ''सत्यम् शिवम् सुंदरम्'' या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा वीज कर्मचाऱ्यांनी सहपरिवार आनंद लुटला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65753 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top