खरेदी विक्री संघांसह विविध पतसंस्थांच्या निवडणुका लवकरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरेदी विक्री संघांसह विविध
पतसंस्थांच्या निवडणुका लवकरच
खरेदी विक्री संघांसह विविध पतसंस्थांच्या निवडणुका लवकरच

खरेदी विक्री संघांसह विविध पतसंस्थांच्या निवडणुका लवकरच

sakal_logo
By

खरेदी-विक्री संघांसह विविध
पतसंस्थांच्या निवडणुका लवकरच
सहकार विभागाकडून मतदार याद्या निश्‍चिती पूर्णत्त्वाकडे

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ७ ः जिल्ह्यातील आठ तालुका खरेदी-विक्री संघ, जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था, राज्य सरकारी सहकारी पतसंस्था आदींच्या संचालक मंडळाच्या निवडणुका येत्या आठ दिवसांत लागण्याची शक्यता आहे. या संस्थांच्या सभासद मतदारांच्या याद्या निश्‍चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील ‘क’ व ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात पार पडल्या. आता जिल्हा खरेदी-विक्री संघ, आठ तालुका खरेदी-विक्री संघ, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था, प्राथमिक शिक्षक पतपेढी, माध्यमिक शिक्षक पतपेढी, जिल्हा मजूर फेडरेशन, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अशा ‘ब’ वर्गातील महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने सुरू केल्या आहेत. यातील जिल्ह्यातील आठही तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीची पूर्व तयारी सुरू झाली आहे. या आठही संघाकडून संस्था सभासदांच्या मतदार याद्या प्राप्त करून घेण्यात आल्या आहेत. सभासद संस्थांनी मतदानाचा अधिकार देत तसे ठराव तालुका खरेदी-विक्री संघाला दिले आहेत. तालुका खरेदी-विक्री संघांनी हे ठराव जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाकडे दिले आहेत. आता जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने आठही तालुका खरेदी-विक्री संस्थांकडे व्यक्तिगत सभासद मतदारांची यादी मागविली आहे. यासाठी ८ जून ही डेडलाईन दिली आहे. त्यामुळे ही यादी प्राप्त होताच आठही तालुका खरेदी-विक्री संघांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद पतसंस्थेसाठी ८८१ मतदार निश्‍चित
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक मुदत संपली आहे. त्यामुळे येथे नवीन संचालक मंडळ येण्यासाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यासाठी आवश्यक पूर्व तयारी जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात सुरू आहे. मतदार यादी निश्‍चित करीत ती सहकार विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. एकूण ८८१ मतदार निश्‍चित झाले आहेत. यात दोडामार्ग ४३, सावंतवाडी १०५, वेंगुर्ले ८४, कुडाळ १११, कणकवली ११८, मालवण ८७, देवगड ६९, वैभववाडी ४६ तर जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी २१८ सभासद मतदार आहेत.

जिल्हा मुख्यालयात सर्वाधिक मतदार
जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठीही दोन हजार ८० एवढे मतदार निश्‍चित झाले आहेत. यात सर्वाधिक ९३८ मतदार जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीमध्ये आहेत. दोडामार्ग ६८, सावंतवाडी २५३, वेंगुर्ले १६९, कुडाळ १८२, कणकवली २०४, मालवण १५६, देवगड ८०, वैभववाडी ४० असे तालुकानिहाय मतदार निश्‍चित झालेले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65784 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top