प्रवीण देसाई यांना समाजरत्न पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवीण देसाई यांना
समाजरत्न पुरस्कार
प्रवीण देसाई यांना समाजरत्न पुरस्कार

प्रवीण देसाई यांना समाजरत्न पुरस्कार

sakal_logo
By

L२७६७८

ओळ - पणजी ः येथे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रवीण देसाई.

प्रवीण देसाई यांना
समाजरत्न पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ ः डेगवे गावचे उपसरपंच तथा डेगवे सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई यांना राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार २०२२ अंतर्गत राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पणजी गोवा येथे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्यांना राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार देण्यात येतात. श्री. देसाई हे गेली ३० वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत डेगवे गाव, सावंतवाडी तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा पातळीवर विविध शासकीय, अशासकीय पदांवर काम केले आहे. येथील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. केंद्रीय मंत्री नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी नरेंद्र सावईकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
---------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65910 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top