कणकवली : सोसायटी निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : सोसायटी निवडणूक
कणकवली : सोसायटी निवडणूक

कणकवली : सोसायटी निवडणूक

sakal_logo
By

कणकवली कंझ्युमर सोसायटीची ८ जुलैला निवडणूक
नलावडे विरुद्ध पारकर गटात सामना रंगण्याची शक्‍यता

कणकवली, ता. ८ : कणकवली शहरातील सहकार क्षेत्रात महत्त्वा‍ची असलेल्‍या कणकवली कंझ्युमर सोसायटीची निवडणूक ८ जुलैला होणार आहे. या सोसायटी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, १४ जूनपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. सध्या या सोसायटीवर नलावडे गटाचे वर्चस्व असून, संदीप नलावडे हे अध्यक्ष तर अण्णा कोदे हे उपाध्यक्ष आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्‍या सोसायटी निवडणुकांत शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे. त्‍याच धर्तीवर कणकवली सोसायटी निवडणुकीत शिवसेना नेते संदेश पारकर यांचे समर्थक आणि भाजपचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या समर्थकांत चुरस पाहायला मिळणार आहे.

कणकवली तालुक्‍यातील विविध सोसायट्यांच्या निवडणुकांत यंदा शिवसेनेने ताकद पणाला लावून अनेक सोसायट्या ताब्‍यात घेतल्‍या. त्‍याच धर्तीवर कणकवली सोसायटीची निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेकडून रणनीती आणली जात आहे. दरम्‍यान, कणकवली नगरपंचायतीची निवडणूक आठ महिन्यांवर आली आहे. त्‍यामुळे सोसायटी निवडणूक ही नगरपंचायत निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. त्‍यामुळे भाजपकडूनही सोसायटी आपल्‍या ताब्‍यात ठेवण्यासाठी प्रयत्‍न केले जात आहेत. त्‍यामुळे कणकवली सोसायटीची निवडणूक रंगतदार होण्याची शक्‍यता आहे.
कणकवली सोसायटी निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची सुरुवात झाली. १४ जूनपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र निवडणूक कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. सहायक निबंधक सहकारी संस्था कणकवली बाजारपेठ येथे निवडणूक कार्यालय असणार आहे. १५ जून रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार आहे, तर १६ जून रोजी वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ३० जूनपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत. १ जुलैला वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ८ जुलै रोजी या निवडणुकीकरिता मतदान घेण्यात येणार असून, मतदान झाल्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणी केली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65983 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top