रत्नागिरी ः रत्नागिरीतील तरुण क्रीडा शिक्षकाचा अपघाती मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः रत्नागिरीतील तरुण क्रीडा शिक्षकाचा अपघाती मृत्यू
रत्नागिरी ः रत्नागिरीतील तरुण क्रीडा शिक्षकाचा अपघाती मृत्यू

रत्नागिरी ः रत्नागिरीतील तरुण क्रीडा शिक्षकाचा अपघाती मृत्यू

sakal_logo
By

--rat8p26.jpg
27797
-रत्नागिरी- ओंकार बाणे
-------------
रत्नागिरीतील क्रीडा शिक्षकाचा अपघाती मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः परटवणे येथून साळवी स्टॉपच्या दिशेने निघालेल्या क्रीडा शिक्षकाला वाटेतच मृत्यूने गाठले. उद्यमनगर, चंपक मैदानासमोर रस्त्यातील मोकाट गुरांना धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार क्रीडा शिक्षक रस्त्यात कोसळल्याने डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
ओंकार उदय बाणे (वय ३०, रा. गुरुमळी बाणेवाडी) हे गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये गेल्या ६ वर्षांपासून क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत होते. काल (ता. ६) ओंकार रात्री साडेदहा वाजेपर्यंत घरीच होते. रात्री तो त्याची दुचाकी घेऊन शहरात आले. रात्री घरी जाण्यासाठी निघाले असताना साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उद्यमनगर चंपक मैदानासमोर गुराला धडकल्याने त्याच्या दुचाकीचा गंभीर अपघात झाला. बराच वेळ ते रस्त्यात पडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उशिरा उपचार मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. ओंकार हे खो-खो, कबड्डी, क्रिकेट या खेळात निपुण होते. गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये गेल्या ६ वर्षापासून क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजल्यावर शेकडोंच्या संख्येने तरुणवर्गाने शासकीय रुग्णालयात धाव घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66020 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top