रस्त्यावरील खडीमुळे बांद्यात दोन अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावरील खडीमुळे बांद्यात दोन अपघात
रस्त्यावरील खडीमुळे बांद्यात दोन अपघात

रस्त्यावरील खडीमुळे बांद्यात दोन अपघात

sakal_logo
By

रस्त्यावरील खडीमुळे
बांद्यात दोन अपघात
बांदा, ता. ७ ः बांदा-आंबोली मार्गावरून खडीची वाहतूक करताना बांदा शहरातील निमजगा येथे रस्त्यावर बारीक खडी पडल्याने एका मोटारीला अपघात झाला. मोटार रस्त्याशेजारील कठड्याला जाऊन आदळली. तर त्याच रस्त्यावरून एक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर यांनी तत्काळ धाव घेत रस्त्यावरची खडी बाजूला केली. या मार्गावर निमजगा येथे शाळा असल्याने रस्त्यावर गतिरोधक आहेत. खडी वाहतुकीचे डंपर ओव्हरलोड वाहतूक करत असल्याने गतिरोधक असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खडी रस्त्यावर पडून अपघात होतात. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व बांदा पोलिस ठाण्यात पत्र देणार असल्याचे श्री. बांदेकर यांनी सांगितले. संबंधित विभागाने यावर वेळीच लक्ष देऊन वाहतूक मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी श्री. बांदेकर यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66037 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top