
संक्षिप्त
rat8p19.jpg
27735
ः राळेगणसिद्धी ः येथे भरतनाट्यम् सादर करणाऱ्या ॐ कार कलानिर्मिती केंद्राचे गौरव करण्यात आले.
....
ओमकार कलानिर्मिती केंद्राचे
राळेगणसिद्धी येथे भरतनाट्यम्
चिपळूण ः राळेगणसिद्धी येथे राष्ट्रीय पर्यावरणमित्र बहुउद्देशीय संस्था भारतचा चौथा वर्धापन दिन झाला. त्यात भरतनाट्यम् सादर करण्याची संधी ॐकार कलानिर्मिती चिपळूण या भरतनाट्यम् प्रशिक्षण संस्थेला मिळाली. ५ जूनला पर्यावरणदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय पर्यावरणमित्र बहुउद्देशीय संस्था भारत यांच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार सोहळा राळेगणसिद्धी येथे झाला. पद्मभूषण अण्णा हजारे आणि या संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ आणि ५ जूनला हा कार्यक्रम झाला. आदर्श समाजरत्न, शिक्षक, हिरकणी, काव्यरत्न, अन्नदाता असे विविध राष्ट्रीय पुरस्कार घोषित केले होते. ॐकार कलानिर्मिती चिपळूण या संस्थेच्या संचालिका ज्योती ढवण - वरपे यांनी आपल्या काही विद्यार्थिनींना सोबत घेऊन पुष्पांजली आणि पर्यावरणदिन असल्यामुळे वृक्षवल्ली आम्हां सोयरे, या तुकोबांच्या अभंगावर भरतनाट्यम् सादर केले. त्यांच्या या भरतनाट्यममध्ये सावरी शिंदे, आचल बांदेकर, ईशा कदम, शांभवी पोंक्षे, अंजली डोंगरे या विद्यार्थिनींनी साथ दिली. राळेगणसिद्धी येथे या सर्वांना राष्ट्रीय पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तर संचालिका ज्योती ढवण-वरपे यांनाही सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवले.
----------
rat8p18.jpg
L27734
ः चिपळूण ः येथील डीबीजे महाविद्यालय आणि पालिकेतर्फेत शिवस्वराज्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
.......
डीबीजेतर्फे शिवस्वराज्य दिन साजरा
चिपळूण ः येथील डीबीजे महाविद्यालयात नुकतेच ''शिवस्वराज्य दिन'' साजरा करण्यात आला. या निमित्त चिपळूण पालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आणि महाविद्यालयाचे रजिस्ट्रार नरेंद्र पेढामकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. शिंगटे यांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर शहरात शिवरायांचा जयजयकार करत शिवज्योत रॅली काढण्यात आली. रॅलीची सांगता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व शिवज्योतीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी प्रा. डॉ. जी. बी. राजे यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी विचार मांडले. मुख्याधिकारी शिंगटे यांनीही विद्यार्थ्यांना शिवरायांचे विचार आत्मसात करण्याचे सांगून विचार व्यक्त केले. या वेळी नवकोकण संस्थेचे सचिव अतुल चितळे, चिपळूण पालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालय अधीक्षक अनंत मोरे आदी उपस्थित होते.
----------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66043 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..