
पाचलमधील महिला प्रभाग संघाचे कार्य कौतुकास्पद
rat8p33.jpः
27805
राजापूरः प्रभाग संघाच्या बैठकीला उपस्थित महिला.
---------------
पाचलमधील महिला प्रभाग
संघाचे कार्य कौतुकास्पद
राजापूर, ता. ८ः सहकाराच्या तत्त्वानुसार एकत्रित येत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत गठित झालेल्या भारतमाता महिला प्रभाग संघ पाचलचे कार्य आणि त्यामध्ये सहभागी बचतगटामधील महिलांचे योगदान कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आमदार राजन साळवी यांनी काढले.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या भारतमाता महिला प्रभाग संघ पाचलची वार्षिक सर्वसाधारण सभा विशाखा पाचलकर यांच्या अध्यक्षतेखाली पाचल येथे झाली. या वेळी शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक दूर्वा तावडे, उमेद अभियानाच्या तालुका व्यवस्थापक साक्षी वायगंणकर, पंचायत समितीच्या माजी उपसभापती अमिता सुतार, पाचलच्या सरपंच पाचल अपेक्षा मासये, सेनेचे विभागप्रमुख गणेश तावडे, आत्माराम सुतार, सिद्धार्थ जाधव, उमेदचे अमित जोशी, अवधूत टाकवडे, शैलेश लिंगायत, कृषी सहाय्यक संतोष मदने, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार साळवी यांनी पाचल प्रभाग संघासह त्यामध्ये कार्यरत असलेल्या बचतगटांनी राबवलेले विविध उपक्रम आणि उभारलेले छोटे-छोटे व्यवसाय त्यातून, साधलेली आर्थिक उन्नतीचे विशेष कौतुक केले. या वेळी ते म्हणाले की, ''विविध उपक्रम राबवताना छोटे-छोटे व्यवसाय करत बचतगटाच्या महिला स्वतःसह कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांची भूमिका अन् योगदान निश्चितच महत्वपूर्ण ठरत आहे.'' या वेळी तावडे, सरपंच मासये, उमेदच्या व्यवस्थापक वायंगणकर आदींनी मार्गदर्शन केले तर, कृषी सहाय्यक मदने यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66046 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..