रत्नागिरी-सुरक्षेसाठी तत्काळ संरक्षण भिंत उभारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-सुरक्षेसाठी तत्काळ संरक्षण भिंत उभारा
रत्नागिरी-सुरक्षेसाठी तत्काळ संरक्षण भिंत उभारा

रत्नागिरी-सुरक्षेसाठी तत्काळ संरक्षण भिंत उभारा

sakal_logo
By

परशुराम घाटाच्या सुरक्षा बैठक... लोगो
...
सुरक्षेसाठी तत्काळ संरक्षण भिंत उभारा

जिल्हाधिकारी; घाटाच्या सुरक्षेसाठी सजग रहा
रत्नागिरी, ता. ८ : परशुराम घाटात दरड कोसळून हानी होवू नये, यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. दरडीचा धोका राहू नये, यासाठी उर्वरित बाजूनेही तत्काळ संरक्षण भिंत उभारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पावले उचलावीत व प्रस्ताव सादर करून तत्काळ काम सुरू करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज दिले.
याबाबत आज दूरदृश्य प्रणालीद्वारे पेढे-परशुराम येथील गावकरी तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी व संबंधित यंत्रणांची बैठक घेतली. या ठिकाणी काही घरांवर दरड कोसळण्याचा धोका आहे, असे नागरिकांचे म्हणणे होते. त्या पार्श्वभूमीवर या सर्वांनी प्रसंगी स्थलांतरित करण्यात यावे, याबाबत चर्चा झाली. घाटाच्या आतापर्यंत झालेल्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. घाटाच्या एका बाजूने संरक्षण भिंत बांधून झाली आहे. दुसऱ्या बाजूनेही अशी भिंत उभारणी आवश्यक असल्याचे सांगून याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ काम सुरू करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले, पावसाच्या काळात वाहनांवर दरड कोसळून अपघात होवू शकतो. त्यामुळे अशावेळी प्रसंगी काही काळ वाहतूक थांबविण्याबाबत देखील यावेळी चर्चा झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66049 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top