चिपळूण-लाईफकेअर हॉस्पिटल येथे एसटी बस थांबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-लाईफकेअर हॉस्पिटल येथे एसटी बस थांबा
चिपळूण-लाईफकेअर हॉस्पिटल येथे एसटी बस थांबा

चिपळूण-लाईफकेअर हॉस्पिटल येथे एसटी बस थांबा

sakal_logo
By

- ratchl82.jpg
27831
- चिपळूण ः बस थांब्याचे उदघाटनाप्रसंगी लाईफकेअर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी.
-----------
लाईफकेअर हॉस्पिटल येथे एसटी बस थांबा

चिपळूण, ता. ८ ः लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चिपळूण ते गुहागर जाणाऱ्या बसेसने हॉस्पिटलपर्यंत येण्यासाठी बस थांबा जवळ नसल्याने त्रास सहन करावा लागत होता. याबाबत आरोग्यमित्र प्रथमेश शिंदे यांनी गुहागर आगार व्यवस्थापक रवींद्र कांबळी व वैभव पवार, चिपळूण आगाराचे रणजित राजेशिर्के यांच्याशी संपर्क साधला. त्याला सर्वच अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत चांगला प्रतिसाद दिला. त्यानुसार गुहागर बायपास मार्गावर लाईफकेअर रुग्णालयामोर बस थांबा मंजूर केला आहे. या बस थांब्याचे उदघाटन नुकतेच झाले.
चिपळूण-गुहागर मार्गावर तसेच मिरजोळीच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या गुहागर बायपास रोडमार्गे वळवण्यात आल्या आहेत. एक थांबा लाईफकेअर हॉस्पिटल येथे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे नुकतेच लाईफकेअर हॉस्पिटल येथे बस थांब्याचे उदघाटन करण्यात आले. गुहागर बायपास रोड मार्गे जाणाऱ्या बसेस लाईफकेअर हॉस्पिटल येथे थांबणार आहेत. यामुळे गरजू रुग्णांची खूप मोठी सोय झाली आहे. हॉस्पिटल प्रशासनातर्फे डॉ. समीर दळवी, डॉ. विष्णू माधव, डॉ. हुजैफा खान, डॉ. परकार डॉ. परदेशी, श्री पिरजादे व हॉस्पिटल व्यवस्थापकीय विभागाने प्रथमेश शिंदे तसेच दोन्ही प्रमुखांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66061 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top