रत्नागिरी-आगामी निवडणुकीमध्ये जिल्ह्यात सेनेचाच भगवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-आगामी निवडणुकीमध्ये जिल्ह्यात सेनेचाच भगवा
रत्नागिरी-आगामी निवडणुकीमध्ये जिल्ह्यात सेनेचाच भगवा

रत्नागिरी-आगामी निवडणुकीमध्ये जिल्ह्यात सेनेचाच भगवा

sakal_logo
By

शिवसेना चिन्ह वापरा
....
निवडणुकीत सेनेचा विजय निश्‍चित

शिवसेना जिल्हाप्रमुख चाळकेंचा विश्‍वास; पक्षाच्या आदेशानंतर पुढील निर्णय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात शिवसेनेचाच भगवा फडकणार यात शंकाच नाही. ज्या चिपळूण, देवरूख पालिका गेल्या होत्या, त्या देखील आम्ही यावेळी ताब्यात घेऊ. स्वबळावर निवडणूक लढल्यास सेनेला मोठा विजय मिळेल. परंतु राज्यात महाविकास आघाडी असल्याने पक्षाच्या आदेशानंतर पुढील निर्णय होईल, असे शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे जोरदार वारे आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून मेळावे सुरू झाले आहेत. यावर बोलताना चाळके म्हणाले, जिल्ह्यात आजही शिवसेनेची मोठी ताकद आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्वांत जास्त ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकात जिल्हा परिषद, पंचायत समितींवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून गट आणि गणनिहाय मेळावे सुरू आहेत. याला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरून सेनेची ग्रामीण भागातील ताकद स्पष्ट होत आहे. इतर कोणत्याही पक्षाचे मेळावे एवढ्या मोठ्या संख्येने होताना दिसत नाही. पालिका आणि नगरपंचायतीमध्येही शिवसनेची ताकद आहे. चिपळूण पालिका आणि देवरूख नगरपंचायत सेनेच्या हातून गेली होती. आम्हाला विश्वास आहे की, या निवडणुकीत या दोन्ही पालिका शिवसेनेच्या ताब्यात असतील.
...
चौकट
ग्रामीण भागातील घराघरांत सेना..
रत्नागिरी शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांना राजकीय भूमिकेबाबत विचारले असता, ते म्हणाले, रत्नागिरी तालुक्याचा विचार करता ग्रामीण भागासह शहरात मोठा विकास झाला आहे. तालुक्यातील सर्वांत जास्त ग्रामपंचायती स्वः मालकीच्या इमारतीमध्ये आहेत. हे मंत्री सामंत यांच्यामुळे शक्य झाले आहे. सेना ग्रामीण भागातील घराघरांत रुजली आहे. स्वबळावर निवडणूका लढल्यास सेनेला नक्की यश मिळेल.
..
चौकट
पालिका निवडणुकीतही सर्वांत जास्त मिळतील..
रत्नागिरी पालिकेचा विचार केला तर सुधारित पाणी योजना, गॅस लाईन, चकाचक झालेले रस्ते, पर्यटन वाढीसाठी सुशोभित करण्यात येणारे चौक, तारांगण आदी कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीतही शिवसेनेला सर्वांत जास्त जागा मिळून पालिकेवरही फगवा फडकणार यात शंकाच नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66087 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top