
बारावीच्या परीक्षेत मालवणचा डंका
फोटोसाठी जागा सोडा
टीपः swt८३१.jpg मध्ये फोटो आहे.
हर्षिता ढोके, अतिकुरेहमान अंसारी, सिद्धी घाडी
बारावीच्या परीक्षेत मालवणचा डंका
तालुक्याचा निकाल ९९ टक्के; टोपीवाला महाविद्यालयाची हर्षिता ढोके प्रथम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात तालुक्याचा निकाल ९९.३४ टक्के लागला आहे. येथील टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेची विद्यार्थिनी हर्षिता ढोके ही ५३९ गुण मिळवित तालुक्यात प्रथम, न्यू इंग्लिश स्कूल आचरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची दीपिका चव्हाण ५२३ गुण मिळवून द्वितीय, तर टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा अतिकुरेहमान अंसारी ५२२ गुण मिळवून तृतीय आला.
महाविद्यालयांचा शाखानिहाय निकाल असा ः ना. अ. दे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय- विज्ञान-अतिकुरेहमान अंसारी (८७ टक्के), मिहिका केनवडेकर (८६.५०), प्रेरणा कुबल (७८.३३), वाणिज्य-तनुजा धुरी (८४.३३), कुणाल बिरमोळे (८१.३३), गौरवी हडकर (८१.१७), श्रेयसी गिरी (८१.१७), कला-हर्षिता ढोके (८९.३०), अमृता वायंगणकर (७७.५०), करुणा हट्टीकर (७७.३३), व्होकेशनल-तनया माधव (७४.८३), गणेश सांडव (७४.१७), दिव्या सावंत (७३.३३) गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९८.९० टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल (९७.५३ टक्के), कला शाखेचा निकाल ९७.५३ टक्के, तर व्होकेशनल शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
पोईप-विरण कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. कला-प्रगती सावंत (६७.५०), संतोषी चव्हाण (६३.३३), योगिता परब (६०.६७), वाणिज्य- श्वेता पोईपकर (७३.८३), अभिषेक तावडे (७२.६७), संकेत सावंत (७०.१७) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, विद्यमान संचालक, प्राचार्य श्री. कांबळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले. वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. यात वाणिज्य-जागृती सावंत (८६ टक्के), मयुरी राऊत (७३.६७), साक्षी घाडी (७२.५०), कला-लिना बुट्टे (७७.६७), संजना घाडी (७७ टक्के), मृणाली घाडी (७६.१७) गुण मिळवून यशस्वी झाले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त अॅड. एस. एस. पवार, डॉ. व्ही. सी. वराडकर, अध्यक्ष अजयराज वराडकर, आनंद वराडकर, सुनील नाईक, विजयश्री देसाई, रवींद्रनाथ पावसकर आदींनी अभिनंदन केले. न्यू इंग्लिश स्कूल आचरा कनिष्ठ महाविद्यालयः वाणिज्य-सिद्धी घाडी (८६.८३), ऋग्वेद सरजोशी (८५.६७), साक्षी धुमडे (७९.८३), कला-दीपिका चव्हाण (८७.९७), लक्ष्मी पारकर (८२.१७), पालवी आचरेकर (७३.३३) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब, सचिव अशोक पाडावे, नीलिमा सावंत, मुख्याध्यापक गोपाळ परब यांनी अभिनंदन केले. स. का. पाटील आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. कला-पौर्णिमा गावडे (७८.५०), सर्वेश कुबल (७७.५०), लोपेश परब (७६.६७), वाणिज्य-राहुल वालावलकर (८०.१७), निकिता शर्मा (७६ टक्के), दिव्या निकम (७१.६७) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. उज्ज्वला सामंत, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे. मसुरे येथील एमजी बागवे भरतगड उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. यात विघ्नेश चव्हाण (७०.६७), साहिल नाईक (६९.८३), चेतन परब (६६.१७) गुण मिळवून यशस्वी झाले. भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान-प्रथमेश आर्लेकर (३७८ गुण), मुस्कान शेख (३६०), यश पिळणकर (३६०), निकीता मेस्त्री (३५२), कला- पियुष चव्हाण (४५८), चिन्मय ढोके (४२८), ओम शिंदे (४२५), वाणिज्य- प्रेरणा पाताडे (५०४), भक्ती तेंडुलकर (४८१), पूजा पाडावे (४८०) मिळवून यशस्वी झाले. वराडकर इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे.
---
इतर विद्यालयांचा निकाल
विज्ञान-वैष्णवी सावंत (८६ टक्के), आदर्श जोशी (८५.१७), नूतन परब (८४.६७) गुण मिळवून यशस्वी झाले. सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर वराड कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात तन्वी चव्हाण (७७.५०), रसिका परब (७५.१७), महेश सावंत (७२.५० टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. (स्व.) जयश्री वामन प्रभू कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकालही १०० टक्के लागला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66110 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..