‘महाराष्ट्र चेंबर’तर्फे कुडाळात आज परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महाराष्ट्र चेंबर’तर्फे कुडाळात आज परिषद
‘महाराष्ट्र चेंबर’तर्फे कुडाळात आज परिषद

‘महाराष्ट्र चेंबर’तर्फे कुडाळात आज परिषद

sakal_logo
By

swt९१.jpg
27954
संगीता पाटील

‘महाराष्ट्र चेंबर’तर्फे कुडाळात आज परिषद
सागर नागरेः उद्योग-व्यवसायाबाबत महिलांना मार्गदर्शन करणार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः कोकण विभागातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध उद्योग-व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने उद्या (ता. १०) दुपारी ३ वाजता महालक्ष्मी हॉल, पंचायत समिती जवळ, कुडाळ येथे परिषदेचे आयोजन केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे सरव्यवस्थापक सागर नागरे यांनी दिली.
महिलांना व्यापार-उद्योग सुरू करण्यासाठी राज्य व केंद्राच्या विविध योजनांची माहिती देणे, प्रकल्प उभारणीसाठी तांत्रिक मार्गदर्शनापासून अर्थसहाय्य विक्री व्यवस्था उभारण्यास सहकार्य करणे, महिलांच्या उद्योगासाठी जागा उपलब्ध करून देणे यांसह महिलांना उपलब्ध कौशल्य प्रशिक्षणाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन सौ. संगीता पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. महाराष्ट्र चेंबरने २०२२-२७ या कालावधीसाठीचे महिला उद्योजकता धोरण तयार केले आहे. या धोरणातून कोकणसाठी काय मिळेल, याची घोषणा या परिषदेत केली जाणार आहे.
महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा ग्रामीण यंत्रणा, सिंधुदुर्गचे प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर, महिला समितीच्या उपाध्यक्ष कविता देशमुख यांच्यासह विविध मान्यवर या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. चेंबरचे कोकण विभागाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य श्रीकृष्ण परब, भालचंद्र राऊत, अशोक सारंग, महेश मांजरेकर, मनोज वालावलकर या परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती श्री. सागरे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66226 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top