वेंगुर्लेत सायकल रॅलीला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत सायकल रॅलीला प्रतिसाद
वेंगुर्लेत सायकल रॅलीला प्रतिसाद

वेंगुर्लेत सायकल रॅलीला प्रतिसाद

sakal_logo
By

swt९१०.jpg
२७९७१
वेंगुर्लेः सायकल रॅलीतील सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

वेंगुर्लेत सायकल
रॅलीला प्रतिसाद
वेंगुर्ले, ता. ९ ः नेहरू युवा केंद्र वेंगुर्ले व वेंगा बॉईज यांच्यावतीने सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीचे उद्घाटन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नेहरू युवा पुरस्कार विजेते डॉ. संजिव लिगवत यांच्या हस्ते करण्यात आले. येथील साई मंगल कार्यालय, जुने बसस्थानक, दाभोली नाका, हनुमान मंदिर, लौकिक हॉटेल, रामेश्वर मंदिर थांबा ते पुन्हा साई मंगल कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. प्रथम आलेल्या २० सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी वेंगा बाँईजचे मार्गदर्शक डॉ. प्रल्हाद मणचेकर, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, डॉ. राजेश्वर उबाळे, पोलिस कॉन्स्टेबल मनोज परुळेकर, अमित म्हापणकर, मुकुल सातार्डेकर, अनिकेत कुंडगीर, वैभव शिंदे, कार्तिक दरेकर, युवराज जाधव, श्री. प्रजापत, मुक्त्यार अत्तार, नेहरू युवा समन्वयक श्रीहर्षा टेंगशे, विश्वजीत जाधव, प्रथमेश पेडणेकर व मदर तेरेसा हायस्कूल, वेंगुर्लेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66240 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top