संभाव्य मत्स्यसाठे तंत्रज्ञानाचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाव्य मत्स्यसाठे तंत्रज्ञानाचा वापर
संभाव्य मत्स्यसाठे तंत्रज्ञानाचा वापर

संभाव्य मत्स्यसाठे तंत्रज्ञानाचा वापर

sakal_logo
By

३ जून टुडे ४ वर सदर लागले आहे
...
(आधुनिक मत्स्यपुराण ...............लोगो)
----
फोटो - rat9p8.jpg
L27952
- सुशील कांबळे
........
इंट्रो
सागरी मासेमारीमध्ये, समुद्रामध्ये मासे शोधणे आणि पकडणे हे नेहमीच एक आव्हानात्मक काम असते. बऱ्याचदा, माशांचा शोध घेण्यासाठी बराच वेळ आणि इंधन लागते. त्यामध्ये त्यांचा मासे पकडण्यासाठीचा खर्च वाढतो व वेळही फुकट जातो. त्यामुळे सागरी मासेमारी हे अनिश्चित स्वरूपातील उपजीविकेचे साधन आहे, असेही म्हणता येईल. मासेमारीला समुद्रातील मत्स्यसाठ्यांची माहिती आधीच मिळाली तर तो आपली नौका घेऊन थेट त्या ठिकाणी जाऊन मासेमारी करू शकेल. त्यामुळे त्याच्या नौकेसाठी लागणाऱ्या इंधनाची बचत होईल व त्यावर होणारा खर्च कमी होईल, त्याचप्रमाणे वेळही वाचेल. परिणामी मासेमारीतून त्याला जास्त फायदा होईल. त्यामुळे मासेमारांनी या माहितीचा वापर केला तर कमी वेळेत व इंधनावरील होणाऱ्या खर्चाची बचत करून मासेमारांना त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मदत होईल.
- सुशील चंद्रकांत कांबळे
--------------------------------------
संभाव्य मत्स्यसाठे तंत्रज्ञानाचा वापर

ज्याप्रमाणे पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा आपल्या अन्नाच्या शोधात फिरत असतो, त्याचप्रमाणे मासे समुद्रात वास्तव्य करत असताना ते सतत त्यांचे अन्न शोधत फिरत असतात. त्याचबरोबर जसे माणसाच्या शरीरामध्ये सभोवतालचे वातावरणातील तापमान बदलले तरीही आपल्या शरीराचे तापमान आवश्यक तेवढे राखता येते, तसे माशांमध्ये आढळत नाही. माशांच्या शरीराचे तापमान हे त्यांच्या सभोवतालच्या पाण्याच्या तापमानाप्रमाणे बदलते. त्यामुळे मासे हे अशा जागी वास्तव्य करतात, जेथे पाण्याचे तापमान हे त्यांच्या शरीराला आवश्यक असलेल्या तापमानाएवढे असेल. त्यामुळे, मासे हे साधारणपणे खाद्य व पाण्याचे तापमान या दोन कारणांमुळे सतत स्थलांतर करत असतात व जेथे त्यांचे मुबलक खाद्य व पाण्याचे योग्य तापमान मिळेल, तेथे ते एकत्रित आलेले आढळतात. जर आपण समुद्रात ठराविक वेळी माशांचे मुबलक खाद्य म्हणजे प्लवंग किंवा हरितद्रव्ये व त्यांच्या शरीरासाठी आवश्यक पाण्याचे तापमान कुठे उपलब्ध आहे हे शोधू शकलो तर त्या जागी मासे एकत्र येतील, याचा अंदाज आपल्याला बांधता येईल. याच तत्त्वाच्या आधारावर, अवकाशात सोडलेल्या विविध उपग्रहांवरील वेगवेगळ्या सेन्सर्सद्वारे पाण्यातील हरितद्रव्यांचे प्रमाण, पाण्याचे तापमान, वाऱ्याची दिशा व वेग या संबंधीची माहिती गोळा केली जाते. ही माहिती एकत्र करून त्यावरून समुद्रामध्ये पुढील १-२ दिवसामध्ये कोणत्या ठिकाणी मासे एकत्र येऊ शकतील याबाबत अंदाज व्यक्त केला जातो.
INCOIS ही संस्था दररोज ही माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करते व समुद्रातील संभाव्य मत्स्यसाठ्यांची क्षेत्रे (PFZ) निर्धारित करते. ही क्षेत्रे नकाशा, त्याचबरोबर तक्त्याच्या स्वरूपात किंवा अक्षांश-रेखांश (GPS Points) देऊन भारतीय मासेमार समुदायासाठी उपलब्ध केली जातात. मासेमार या माहितीचा उपयोग करून समुद्रात मासेमारी करतात. त्यामुळे त्याचे डिझेल, श्रम आणि वेळ वाचतो. अशी मासेमारी करताना प्रस्थापित नियमांचे मात्र काटेकोरपणे स्वयंस्फूर्तीने पालन गेले पाहिजे. अन्यथा, मत्स्यसाठे अति प्रमाणात उचलले जाऊन अशाश्वतेत वाढ होते. ( क्रमशः)
(लेखक मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे गियर तंत्रज्ञ आणि आचार्य छात्र आहेत.)
-------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66250 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top