
हर्णै-बेलोसे महाविद्यालयात शिवज्योत रॅली
...
-rat8p24.jpg
L27992
- डॉ. भारत कऱ्हाड
----------
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
समितीवर डॉ. भारत कऱ्हाड
हर्णै ः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सामजिक व आर्थिक सल्लागार समितीवर दापोली येथील वराडकर-बेलोसे महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० अंतर्गत महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना शैक्षणिक सवलती देणे, विद्यापीठ व महाविद्यालये आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि सार्वजनिक व खासगी भागीदारीतून उच्च शिक्षणाच्या गरजांची पूर्ती करणे याबाबत धोरण ठरवण्यासाठी अभ्यास करून राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी प्रा. शाम शिरसाठ, प्र-कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचे गठण करण्यात आले असून समितीत एकूण १५ तज्ञांचा समावेश आहे. ही समिती येत्या तीन महिन्यांत अभ्यास अहवाल राज्य शासनास सादर करणार आहे. संस्थेच्या सभापती जानकी बेलोसे, कार्यवाह डॉ. दशरथ भोसले व कार्यकारिणी सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
-----------------------------------------------------------------
-rat8p5.jpg
27993
ः लांजा ः न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एकत्र आलेले माजी विद्यार्थी.
-------------------
लांजा स्कूलमधील वर्गमित्र
२६ वर्षांनी भेटले !
लांजा ः लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील सन १९९५-९६ मधील दहावी-अ बॅचचे स्नेहसंमेलन आणि गुरुजनांचा आदर सत्कार स्नेहमेळवा आयोजित केला होता. चिंतामणी पोटफोडे यांनी गेट टूगेदरचे महत्त्व विषद केले. गुरुजनांमध्ये उपस्थित असलेल्या विद्यमान मुख्याध्यापक आठवले, माजी मुख्याध्यापक बेर्डे, विधाते, सावंत यांचा सत्कार करण्यात आला. आधीचे विद्यार्थी व आत्ताचे सुजाण नागरिक या नात्याने आपण ज्या शाळेत संस्थेमध्ये शिकलो, त्याचे ऋण कधीही फेडू शकत नाही; पण आपण ज्यामुळे घडलो त्या शाळेला, संस्थेला आपण मदत केली पाहिजे, या हेतूने महेंद्र कोलते याने संस्थेच्या, शाळेच्या मदतीसाठी निधीचा धनादेश प्रदान केला.
----------------
लोकमान्य वाचनालयात शिवस्वराज्य दिन
लांजा ः येथील लोकमान्य वाचनालयाच्या वतीने शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून पोवाडा, कविता वाचनाचा कार्यक्रम झाला. वाचनालयाचे उपाध्यक्ष विजय बेर्डे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या वेली वाचनालयाचे संचालक विजय हटकर, गजानन वाघदरे, उमेश केसरकर, विजयालक्ष्मी देवगोजी, माया तिरमारे आदी उपस्थित होती. उमेश केसरकर यांनी शिवाजी महाराज यांच्यावर कविता सादर केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66251 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..