वागदेत आज शेतकऱ्यांची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वागदेत आज शेतकऱ्यांची बैठक
वागदेत आज शेतकऱ्यांची बैठक

वागदेत आज शेतकऱ्यांची बैठक

sakal_logo
By

वागदेत आज शेतकऱ्यांची बैठक
कणकवलीः सिंधुदुर्गातील काजू पिकाला भौगोलिक मानांकन 2018 (GL-Geographical Indication) प्राप्त झाले आहे. यामध्ये काजू प्रक्रिया उद्योगातील उद्योजकांच्या काजूगराच्या विक्री संदर्भात महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या माध्यमातून काजू प्रक्रिया उद्योगातून तयार होणाऱ्या काजूगराला जागतिक पातळीवर विक्रीची संधी उद्योजकांना प्राप्त झाली आहे. या संदर्भातील नियोजनासाठी बैठक उद्या (ता. 10) दुपारी 2.30 वाजता गोपुरी आश्रमाच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित केली आहे. या सभेत काजूगराच्या विक्रीसंदर्भात नियोजन केले जाणार आहे. ज्यांना काजू पिकाचे भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे, त्या उद्योजक, शेतकरी, विक्रेते यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण काजू समुहाचे अध्यक्ष व काजू प्रक्रिया उद्योजक सुरेश नेरुरकर यांनी केले आहे.
.............
पुस्तक प्रदर्शनाला तळेरेत प्रतिसाद
तळेरेः शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांवरील विविध पुस्तकांचे प्रदर्शन येथील (स्व.) सुनील तळेकर सार्वजनिक वाचनलयात आयोजित केले होते. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष दादा वरुणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, चंद्रकांत तळेकर, तळेरे सरपंच दिनेश मुद्रस, दीपक नांदलसकर, ग्रामसेवक युवराज बोराडे, प्रवीण वरुणकर, हेमंत महाजन, शैलेश सुर्वे, साक्षी तळेकर आदी उपस्थित होते. प्रदर्शनात शिवरायांचे ग्रंथ आणि इतर पुस्तके मांडण्यात आली होती. यावेळी श्री. वरुणकर, श्री. पावसकर, श्रावणी मदभावे यांनी मनोगत व्यक्त केले.
... ..............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66301 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top