कणकवली : पारकर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : पारकर आरोप
कणकवली : पारकर आरोप

कणकवली : पारकर आरोप

sakal_logo
By

L28047

कणकवली शहरातील गारबेज डेपो रस्त्याचे काम निकृष्‍ट
कन्हैया पारकर : खडीकरणात काटामारीचा संशय

कणकवली, ता.९ : कणकवली नगरपंचायतीमार्फत मुडेडोंगरी येथील गारबेज डेपोकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण नुकतेच करण्यात आले. मात्र या कामात मोठा भ्रष्‍टाचार झाला आहे. या रस्त्याचे २२ ते २६ इंचाचे खडीकरण काम अंदाजपत्रकात नमूद होते. प्रत्‍यक्षात इथे ९ इंचाचे खडीकरण झाले असल्‍याने रस्त्याचा दर्जा निकृष्‍ट आहे असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केला.
श्री.पारकर यांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह विरोधी गटनेते सुशांत नाईक, शिवसेना शहरप्रमुख शेखर राणे, नगरपंचायत बांधकाम विभागाचे विभव करंदीकर, सचिन नेरकर यांच्या उपस्थितीत गारबेज डेपो रोडची पाहणी केली. यावेळी रस्ता कामाचे मोजमापही घेण्यात आले. रस्त्याच्या अंदाजपत्रकानुसार डबल लेअर खडीकरण, सोलिंग २२ ते २६ इंच आवश्यक आहे. मात्र रस्ता खोदून सॅम्पल घेतले असता केवळ ९ इंचाचे खडीकरण झाल्‍याची बाब उघड झाल्‍याचे श्री.पारकर म्‍हणाले.
गारबेज डेपोकडे जाणारा रस्ता १४० मिटर लांबीचा आहे. या रस्ता कामासाठी १२ लाख रूपयांचा खर्च झाला असून ठेकेदाराला बिल देखील अदा करण्यात आले आहे. या रस्त्याला मातीकाम साठी १७ हजार ९५२ रूपये खर्च आला असताना ७१ हजार रूपयांच्या दराने बिल बनवून ते ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत. तसेच वाढीव मातीकाम दराला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी न घेता परस्पर ठेकेदाराला बिले अदा करण्यात आल्‍याचेही श्री.पारकर म्‍हणाले.
या रस्ता कामाचे थर्ड पार्टी ऑडिट सुद्धा बोगस असल्याचा आरोप पारकर यांनी केला. तर विरोधी पक्षनेते सुशांत नाईक यांनी ठेकेदाराला हाताशी धरून नगरपंचायत मधील सत्ताधारी निकृष्ट कामांवर शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला. दरम्‍यान कणकवली शहरातील गारबेज डेपो रस्त्यासह अन्य्य बोगस रस्ता कामांची तक्रार बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचेही नगरसेवक पारकर म्हणाले.
-----------------------

सरकारे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66327 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top