
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
-rat9p15.jpg
27964
- राजापूर : भालावली महाविद्यालयात शिव स्वराज्य दिन कार्यक्रमात बोलताना प्रा. प्रणित लिंगायत. शेजारी प्र. प्राचार्य चंद्रशेखर नामजोशी.
-------------
भालावली महाविद्यालयात
शिव स्वराज्यदिन साजरा
राजापूर ः भालावली महाविद्यालयात शिव स्वराज्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्र. प्राचार्य चंद्रशेखर नामजोशी, प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्र. प्राचार्य चंद्रशेखर नामजोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेमागचा मूलगामी विचार विद्यार्थ्यांनी समाजाच्या सर्व घटकांपर्यंत नेणे आवश्यक आहे, असे सांगितले. यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची कल्पना’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले. यात विशाखा पारकर व संकेत लाड या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
-----------
कोतवडे येथे शिवस्वराज्य दिन
रत्नागिरी ः कोतवडे ग्रुप ग्रामपंचायत येथे शिव स्वराज्य दिन साजरा करण्यात आला. सकाळी स्वराज्य गुढी उभारून त्यास अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. या प्रसंगी सरपंच तुफील पटेल, उपसरपंच संतोष बारगोडे, ग्रामविकास अधिकारी देविदास इंगळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण पेडणेकर, माजी उपसरपंच स्वप्निल मयेकर, घारपुरेवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका केळकर, शरद जोगळेकर, मनोहर राऊत, तात्या राणे, राकेश बारगोडे, चेतन मयेकर, जनार्दन पकये व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66360 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..