संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

-rat9p27.jpg
28058
ःसाडवली ः बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवताना श्री सत्यनारायण प्रासादिक बालमित्र समाजमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
-------------
देवरुखात बारावी परीक्षा
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
साडवली ः देवरूख खालची आळी येथील श्री सत्यनारायण प्रासादिक बालमित्र समाज मंडळाच्यावतीने बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाइन जाहीर झाला. देवरूख खालची आळी येथील श्री सत्यनारायण प्रासादिक बालमित्र समाज मंडळाच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले जातात. बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अजित सावंत, उपाध्यक्ष सुरेश करंडे, सचिव रवींद्र सुवारे, सहसचिव मंदार मिशाळे, खजिनदार मंगेश भुवड, सल्लागार विजय सुवारे, समीर चव्हाण, सूरज शिंदे, प्रमोद शिंदे, सुनील खवळे उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये केतकी भुवड, यशश्री जोशी, सोहम लाड, कौस्तुभ डाऊल, सलोनी चव्हाण, अक्षता सुवारे, वैष्णवी चव्हाण, पारस कारेकर, धनिष घाग, साक्षी पवार, आशय बारटक्के यांचा समावेश आहे. मंडळाच्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालक वर्गाने समाधान व्यक्त केले.
--------------------
-rat9p28.jpg
28059
ः चिपळूण ः स्वरा गुजर हिचा सत्कार करताना सावर्डे येथील पदाधिकारी.
----------------
सावर्डेच्या स्वरा गुजरने
पटकावले सुवर्णपदक
चिपळूण ः खेलो इंडिया स्पर्धेत सावर्डे येथील स्वरा गुजर हिने योगा स्पर्धेत सुवर्णपदक आणि ग्रुपमध्ये रौप्यपदक पटकावले. तिचे सावर्डेमध्ये गुरुवारी जोरदार स्वागत करण्यात आले. फट्याक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करून सावर्डेवासीयांनी जल्लोष केला. सावर्डे येथील स्वरा गुजर हिने हरियाणा येथे खेलो इंडिया स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली आहे. सध्या संगमनेर येथे दहावीत शिकत असणारी स्वरा ही योगामध्ये पारंगत आहे. डेरवण येथील इंग्लिश स्कूलमध्ये असल्यापासून ती योगा स्पर्धेत आपली छाप पाडत आहे. ही नॅशनल स्पर्धा ओडिसा येथे झाली होती. या स्पर्धेत ही तिने सुवर्ण व रौप्यपदक मिळवले होते. छोट्या -मोठ्या स्पर्धेत पदकांची लयलूट करणारी स्वरा हिची निवड हरियाणा पंचकुला येथे खेलो इंडिया स्पर्धेसाठी होती. योगा स्पर्धेसाठी देशभरातून स्पर्धक या ठिकाणी आले होते. त्यामधून तिने सुवर्णपदक आणि ग्रुपमध्ये रौप्यपदक मिळवून स्वतःचा ठसा उमटवताना कोकणचेही नाव रोशन केले. आशिया खंडात होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. हरियाणा येथून सावर्डे येथे दाखल झालेल्या स्वरा गुजर हिचे सावर्डेवासीयांनी जोरदार स्वागत केले. या वेळी विजय गुजर, सरपंच समीक्षा बागवे, कांचन पवार, शैला सावंत, नंदकुमार घाग, पूर्वी कोकाटे, गणेश लाड आदी उपस्थित होते.
----------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66362 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top