रत्नागिरी-क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-क्राईम
रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

sakal_logo
By

केरळातील युवकाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी, ता. ९ ः शहरातील तेलीआळी येथील रहिवासी इमारतीच्या सदनिकेत केरळ येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू त्यागराज आचार्य (वय ३५, तेलीआळी, रत्नागिरी; मूळ ः रा. केरळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ९) सकाळी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेली माहिती व बाळकृष्ण मयेकर (रा. काळबादेवी, रत्नागिरी) यांनी दिलेल्या खबरीनुसार राजू आचार्य हा मागील तीन दिवसांपासून मयेकर यांच्या तेलीआळी येथील सदनिकेत वास्तव्याला आला होता. गुरुवारी सकाळी शेजाऱ्यांनी दार ठोठावले असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानुसार मयेकर घटनास्थळी गेले व याबाबत पोलिसांना खबर दिली. पोलिसांच्या मदतीने सदनिकेचा मुख्य दरवाजा उघडण्यात आला. आत प्रवेश केला असता, राजू आचार्य हा मृतावस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. अद्यापही मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66383 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top